प्रणिती शिंदे प्रमुख असलेल्या विधिमंडळ समितीचे आगमन लांबणीवर! आता ४ ऑक्टोबरला येणार जिल्ह्यात!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जाती कल्याण समितीचे आगमन किंचित लांबणीवर गेलेय! आता ही १६ सदस्यीय समिती जिल्ह्यात ४ ऑक्टोबरपासून दाखल होणार आहे. यामुळे जिल्हा प्रशासनासह ५१ कार्यालयांना अनुषंगिक पूर्वतयारीसाठी वाढीव वेळ मिळाल्याने त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. जिल्ह्यातील विविध शासकीय, निम शासकीय विभाग व कार्यालयातील अनुसूचित जाती समितीच्या कल्याणकारी योजना आणि बिंदूनामावली …
 
प्रणिती शिंदे प्रमुख असलेल्या विधिमंडळ समितीचे आगमन लांबणीवर! आता ४ ऑक्टोबरला येणार जिल्ह्यात!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जाती कल्याण समितीचे आगमन किंचित लांबणीवर गेलेय! आता ही १६ सदस्यीय समिती जिल्ह्यात ४ ऑक्टोबरपासून दाखल होणार आहे. यामुळे जिल्हा प्रशासनासह ५१ कार्यालयांना अनुषंगिक पूर्वतयारीसाठी वाढीव वेळ मिळाल्याने त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

जिल्ह्यातील विविध शासकीय, निम शासकीय विभाग व कार्यालयातील अनुसूचित जाती समितीच्या कल्याणकारी योजना आणि बिंदूनामावली आदींची झाडाझडती घेण्यासाठी ही समिती येणार आहे. यापूर्वीचा २८ ते ३० सप्टेंबर दरम्यानचा दौरा अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्याचे महाराष्ट्र विधानमंडळाचे अवर सचिव प्रकाशचंद्र खोंदले यांनी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांना सूचित केले आहे.

परिणामी आता आमदार प्रणिती शिंदे प्रमुख असलेली ही समिती ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात राहणार आहे. या समितीचा बैठक, अन्य कार्यक्रम लवकरच कळविण्यात येईल, असेही खोंदले यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे आता जवळपास ५१ कार्यालयांना आवश्यक अहवाल, माहिती संकलन, प्रश्नावलीचा अभ्यास, अनुसूचित जातीच्या कल्याणकारी योजनांचा आढावा, एससी प्रवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष व जात पडताळणी तथा कल्याणकारी योजनांचा आपल्या स्तरावर आढावा घेण्यासाठी जादाचा वेळ मिळाला आहे.