पाठलाग करून विवाहितेच्‍या हातात दिली चिठ्ठी… म्‍हणाला उत्तर दिले नाही तर तुझा संसार खराब करेन!; बुलडाणा तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात काही दिवसांत विनयभंग, छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत. काल, २७ ऑगस्टला ३० वर्षीय युवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी दाखल केला. विवाहितेचा पाठलाग करून त्याने चिठ्ठी दिली. चिठ्ठीचे उत्तर दिले नाही संसाराचा खेळखंडोबा करण्याची धमकीही दिली. ही घटना साखळी खुर्दमध्ये (ता. बुलडाणा) घडली आहे. ३५ वर्षीय विवाहितेने याप्रकरणात तक्रार दिली. …
 
पाठलाग करून विवाहितेच्‍या हातात दिली चिठ्ठी… म्‍हणाला उत्तर दिले नाही तर तुझा संसार खराब करेन!; बुलडाणा तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात काही दिवसांत विनयभंग, छेडछाडीच्‍या घटना वाढल्‍या आहेत. काल, २७ ऑगस्‍टला ३० वर्षीय युवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्‍हा बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी दाखल केला. विवाहितेचा पाठलाग करून त्‍याने चिठ्ठी दिली. चिठ्ठीचे उत्तर दिले नाही संसाराचा खेळखंडोबा करण्याची धमकीही दिली. ही घटना साखळी खुर्दमध्ये (ता. बुलडाणा) घडली आहे.

३५ वर्षीय विवाहितेने याप्रकरणात तक्रार दिली. २२ ऑगस्टला ती घरासमोर झाडत होती. त्यावेळी गावातीलच अजमत खान सलीम खान (३०) घरासमोर आला. त्याने विवाहितेचा वाईट उद्देशाने हात धरला व हातात चिठ्ठी दिली. तुझी मला चिठ्ठी देण्याची हिंमत कशी झाली, असा जाब विवाहितेने विचारला असता त्‍याने “चिठ्ठीचे उत्तर दिले नाही तर तुझ्या संसाराचा खेळखंडोबा करीन’ अशी धमकी दिली व पळून गेला. यापूर्वीही अजमतने तिचा पाठलाग करून चिठ्ठी देण्याचा प्रयत्‍न केला होता, असे तक्रारीत म्हटले आहे. अजमत खानविरुद्ध बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.