पहाटे चारला “ट्याहा ट्याहा’ने उडाली रहिवाशांची झोप… जाऊन पाहतात तर ट्रॉलीत चक्‍क बाळ!; जळगाव जामाेद येथील घटना

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद शहरातील सुनगाव रोडवर एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत नवजात अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे. नागरिकांना आज, २८ ऑगस्टच्या पहाटे ४ ते ६ वाजेच्या दरम्यान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी ट्रॉलीत जाऊन पाहिले असता अर्भक दिसले. निळकंठेश्वरनगरातील रहिवासी गोपाल वानखडे यांच्या घरासमोरील ट्रॉलीत हे अर्भक कुणीतरी आणून टाकले होते. नागरिकांनी …
 
पहाटे चारला “ट्याहा ट्याहा’ने उडाली रहिवाशांची झोप… जाऊन पाहतात तर ट्रॉलीत चक्‍क बाळ!; जळगाव जामाेद येथील घटना

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद शहरातील सुनगाव रोडवर एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत नवजात अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे. नागरिकांना आज, २८ ऑगस्‍टच्‍या पहाटे ४ ते ६ वाजेच्या दरम्यान बाळाच्‍या रडण्याचा आवाज आला. त्‍यांनी ट्रॉलीत जाऊन पाहिले असता अर्भक दिसले.

निळकंठेश्वरनगरातील रहिवासी गोपाल वानखडे यांच्या घरासमोरील ट्रॉलीत हे अर्भक कुणीतरी आणून टाकले होते. नागरिकांनी जळगाव जामोद पोलिसांना माहिती दिली. त्‍यानंतर पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे, हेडकॉन्स्टेबल दयाराम कुसुंबे, ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकेचे चालक राजू बुटे घटनास्थळी आले. त्यांनी बाळाला ग्रामीण रुग्णालयात आणले.

प्राथमिक उपचारानंतर बाळाला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आले असून, त्याची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले. घटनेची फिर्याद अरुण तुकाराम खिरोडकार यांनी पोलिसांत दिली. त्‍यावरून अज्ञात माता- पित्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल दयाराम कुसुंबे, योगेश निबोळकार, अनिल बुले करत आहेत.