पंचनामे, सर्वेचा फार्स कशाला? तात्काळ मदत द्या; आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांची मागणी, शेतकऱ्यांच्‍या भावनांना प्रशासनापुढे मांडले

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नुकसान काही ठिकाणीच झालेले असेल तर त्याच ठिकाणी सर्वे, पंचनामे करणे ठीक आहे. मात्र निसर्गाने सर्वदूर नुकसान केलेले असल्याने सर्वे व पंचनाम्यांचा फार्स कशाला? असा सवाल करत तातडीने हेक्टरी 25 हजाराची शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी चिखलीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी केली आहे. चिखली तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी …
 
पंचनामे, सर्वेचा फार्स कशाला? तात्काळ मदत द्या; आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांची मागणी, शेतकऱ्यांच्‍या भावनांना प्रशासनापुढे मांडले

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नुकसान काही ठिकाणीच झालेले असेल तर त्याच ठिकाणी सर्वे, पंचनामे करणे ठीक आहे. मात्र निसर्गाने सर्वदूर नुकसान केलेले असल्याने सर्वे व पंचनाम्यांचा फार्स कशाला? असा सवाल करत तातडीने हेक्टरी 25 हजाराची शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी चिखलीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी केली आहे. चिखली तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी त्‍यांनी केली. त्‍यावेळी त्‍यांनी शेतकऱ्यांच्‍या भावना प्रशासनापुढे मांडल्या.

काल, 2 ऑक्टोबरला आमदार सौ. महाले पाटील यांनी चिखली तालुक्यातील सोनेवाडी, सातगाव भुसारी, केळवद, वाडी ब्रह्मपुरी, सवणा, उत्रादा, दिवठाणा, पेठ या गावांत जाऊन नुकसानीची पाहणी केली. ठेकेदाराने हातणी- रायपूर रस्त्याचे काम रखडून ठेवल्याने आणि नालीचे काम न केल्याने रस्त्यालगतचे पाणी शेतांत साचले. त्‍यामुळे उभी पिके सडून गेली. ठेकेदारांच्या चुकीने हे नुकसान झाल्यामुळे आमदार सौ. महाले पाटील यांनी राष्ट्रीय महामार्गाचे जालना विभागाचे कार्यकारी अभियंता चांडक यांना फोन करून शेतात साचलेले पाणी काढून टाकण्याची मागणी केली. वाडी, ब्रह्मपुरी येथे गेल्या असता तेथील जुन्या गावठाणमधील 50 ते 60 घरांना पुराच्या पाण्याच्या वेढा पडतो. त्‍यामुळे या घरांना तेथून हलविण्याची मागणी तेथील नागरिकांनी केली. त्यावर आमदार सौ. महाले पाटील यांनी तहसीलदार डॉ. येळे यांना तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या.

येळगावच्या गोडबोले गेटमुळे अनेक गावे बाधित
पैनगंगा नदीवर येळगाव येथे बांधलेल्या धरणावर गोडबोले गेट धरण 100 टक्‍के भरल्यानंतर स्वयंचलित असल्याने उघडले जातात. त्यामुळे नदीला अचानक पूर येऊन सव, खूपगाव, किन्होळा, वाडी ब्रह्मपुरी, सवणा, दिवठाणा, उत्रादा, पेठ, बोरगाव काकडे, पांढरदेव, देवदरी या गावांत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. अचानक पूर येऊन जिवीत व वित्त हानी होते. त्यामुळे येळगाव धरणावरील गेटबोले गेट स्वयंचलित न ठेवता मॅन्युअली करण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली. यावेळी पंचायत समिती सभापती सौ. सिंधूताई तायडे, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ कृष्णकुमार सपकाळ , भाजपा महिला मोर्चा चिखली तालुकाध्यक्षा सौ. व्दारकाताई भोसले, प्रा. वीरेंद्र वानखेडे, बबनराव राऊत, किशोर जामदार, तहसीलदार डॉ. अजितकुमार येळे, नायब तहसीलदार श्री. वीर, सोनेवाडीचे सरपंच बाळू पाटील, सरपंच बाबुराव देशमुख, अंकुश तायडे, सोनेवाडीचे भगवानराव हाडे यांच्या शेतातील अणि रायपूर शिवार येथे ज्ञानेश्वर पंडित, शेख अजीम यांच्या शेतात पाहणी केली.

पाहणीवेळी भगवान हाडे, सुधाकर शेळके, अरुण तायडे, ज्ञानेश्वर जंजाळ, प्रभाकर तायडे, अंकुश पवार, बाळू पवार, सुरेश तायडे, विलास तायडे, सुधाकर तायडे, गजानन तायडे, अरुण पंडित, सुभाष शिरसाट, गजानन सोनुने, शिवाजी पंडित, शंकर सुरडकर, गणेश तायडे, शरद पवार, ज्ञानेश्वर पंडित, ज्ञानेश्वर पवार, अंकुश सुरडकर, अंकुश नागवे, सतिश शिरसाट, गोपाल वाळेकर, संदेश गोफणे, ज्ञानेश्वर गोफणे, शुभम पवार, राम शिरसाट, पमू हाडे, फकिरा सोनुने, अंकुश सुरडकर, अंकुश पवार, किन्होळा येथील मधुकरराव बाहेकर, अशोकराव बाहेकर, माजी सरपंच दीपक जनार्दन बाहेकर, वसंतराव बाहेकर, संजूकाका बाहेकर, केशव बाहेकर, रामदास बाहेकर, विष्णू बाहेकर, गजानन शेळके, हारूणभाई, संजय बाहेकर, संदीप बाहेकर, पद्मनाभ बाहेकर, सुरेश बाहेकर, सवणा येथील किशोर जामदार, अनुराग भुतेकर, शेख कय्युम, उमेश हांडे, उमेश भुतेकर, गणेश पाटील, राजू भुतेकर आदी उपस्‍थित होते.