नऊ जणांविरुद्ध ६० वर्षीय व्‍यक्‍तीच्‍या खुनाचा गुन्‍हा!; मोताळा तालुक्यातील घटना

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ९ ऑगस्ट रोजी मोताळा तालुक्यातील सारोळा मारोती येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली होती. परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटांतील तब्बल १७ जणांविरुद्ध धामणगाव बढे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. हाणामारीत गंभीर जखमी झालेले प्रभाकर भिका इंगळे यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान १८ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी …
 
नऊ जणांविरुद्ध ६० वर्षीय व्‍यक्‍तीच्‍या खुनाचा गुन्‍हा!; मोताळा तालुक्यातील घटना

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ९ ऑगस्ट रोजी मोताळा तालुक्यातील सारोळा मारोती येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली होती. परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटांतील तब्बल १७ जणांविरुद्ध धामणगाव बढे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. हाणामारीत गंभीर जखमी झालेले प्रभाकर भिका इंगळे यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान १८ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी ९ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

सारोळा मारोती येथे ९ ऑगस्टच्या रात्री जाधव आणि इंगळे परिवारात तुंबळ हाणामारी झाली होती. जुन्या वादावरून ही हाणामारी झाल्याचे सांगण्यात येते. यावेळी लाठ्या, काठ्या व कुऱ्हाडीचा वापर करण्यात आला होता. भांडणात प्रभाकर इंगळे यांच्या डोक्यात व अंगावर कुऱ्हाडीचे घाव लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

१० ऑगस्ट रोजी परस्परविरोधी तक्रारीवरून इंगळे गटातील ६ तर जाधव गटातील ९जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात इंगळे यांचा मृत्यू झाल्याने जाधव गटातील ९ जणांवर आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधुकर भिकाजी जाधव, श्रीधर भिकाजी जाधव, मुरलीधर भिकाजी जाधव, दीपक श्रीधर जाधव, प्रविण उर्फ बापू श्रीधर जाधव, अनिकेत मुरलीधर जाधव, ज्योती मुरलीधर जाधव, संगीता श्रीधर जाधव (सर्व रा. सारोळा मारोती, ता. मोताळा) अशी गुन्‍हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.