धक्‍कादायक… पत्‍नीशी पटत नसल्याने तिच्या भाचीचे फेसबुक अकाऊंट काढून बदनामी!; बुलडाण्यातील प्रकार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पत्नीशी पटत नसल्याने आणि तिच्या चुलत भावाने तिला आधार दिल्याने संतापलेल्या पतीने तिच्या या चुलत भावाच्या मुलीचे बनावट फेसबुक खाते उघडले आणि स्वतःच्या मुलाचे तिच्यासोबत फोटो टाकून बदनामी केली. हा धक्कादायक प्रकार बुलडाण्यात समोर आला आहे. बुलडाणा शहर पोलिसांनी युवकाविरुद्ध या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. राहुल नामदेव वानखडे (रा. …
 
धक्‍कादायक… पत्‍नीशी पटत नसल्याने तिच्या भाचीचे फेसबुक अकाऊंट काढून बदनामी!; बुलडाण्यातील प्रकार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पत्‍नीशी पटत नसल्याने आणि तिच्‍या चुलत भावाने तिला आधार दिल्याने संतापलेल्या पतीने तिच्‍या या चुलत भावाच्‍या मुलीचे बनावट फेसबुक खाते उघडले आणि स्वतःच्‍या मुलाचे तिच्‍यासोबत फोटो टाकून बदनामी केली. हा धक्‍कादायक प्रकार बुलडाण्यात समोर आला आहे. बुलडाणा शहर पोलिसांनी युवकाविरुद्ध या प्रकरणात गुन्‍हा दाखल केला आहे.

राहुल नामदेव वानखडे (रा. वॉर्ड क्र. ३३, संजयनगर, ग्वालटोली, होशंगाबाद राज्य मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. सुंदरखेड भागातील चेतनानगर येथील एका ४३ वर्षीय व्‍यक्‍तीने या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्‍यांची चुलत बहीण मुलासह त्‍यांच्‍याकडे राहते. तिचे पतीशी पटत नाही. राहुलने पत्‍नीच्‍या चुलत भावाच्‍या मुलीचे फेसबुक खाते तयार केले. या अकाऊंटवर मुलीसोबत स्वतःच्या मुलाचे फोटो टाकून या कुटुंबाची बदनामी करणारी पोस्‍ट टाकली. हा माझा होणारा पती आहे, असा उल्लेखही पोस्‍टमध्ये आहे. तपास पोलीस निरिक्षक श्री. सोळंके करत आहेत.