दोन दुचाकींची धडक; शेतकरी ठार, दोघे जखमी, खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात एक जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना काल, ३ सप्टेंबरच्या रात्री साडेनऊच्या सुमारास खामगाव- मेहकर रस्त्यावरील टेंभुर्णा (ता. खामगाव) गावाजवळ घडली. गजानन लक्ष्मण काळाणे (५०, रा. टेंभुर्णा, ता. खामगाव ) असे अपघातात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. गजानन …
 
दोन दुचाकींची धडक; शेतकरी ठार, दोघे जखमी, खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात एक जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना काल, ३ सप्टेंबरच्या रात्री साडेनऊच्या सुमारास खामगाव- मेहकर रस्त्यावरील टेंभुर्णा (ता. खामगाव) गावाजवळ घडली. गजानन लक्ष्मण काळाणे (५०, रा. टेंभुर्णा, ता. खामगाव ) असे अपघातात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

गजानन काळाणे काल रात्री शेतात झोपण्यासाठी त्यांच्या दुचाकीने जात होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारसायकलने (क्र. एमएच २८, एयू ८१७८) त्यांना जबर धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दुसऱ्या मोटारसायकलवरील पंकज नारायण पन्हाळकर (३०, रा. शिवाजी फैल खामगाव) व त्याचा मित्र गंभीर जखमी झाले. त्‍यांना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.