देवगायी ज्यांना चारायला दिल्या, त्यांनीच केली गद्दारी; ६ गायींना बोलेरो पिकअपमध्ये कोंबून नेणाऱ्यांना गावकऱ्यांनी पाठलाग करून पकडले; खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गावातील देवगायी ज्यांना चारायला दिल्या होत्या त्यांनीच गुपचूपपणे त्या विकण्याचा धंदा सुरू केला होता. ६ गायी बोलेरो पिकअपमध्ये कोंबून विक्रीसाठी नेताना गावकऱ्यांनी त्यांना पाठलाग करून पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. काल, २३ ऑगस्ट रोजी जळका तेली शिवारात हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला …
 
देवगायी ज्यांना चारायला दिल्या, त्यांनीच केली गद्दारी; ६ गायींना बोलेरो पिकअपमध्ये कोंबून नेणाऱ्यांना गावकऱ्यांनी पाठलाग करून पकडले; खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गावातील देवगायी ज्यांना चारायला दिल्या होत्या त्यांनीच गुपचूपपणे त्या विकण्याचा धंदा सुरू केला होता. ६ गायी बोलेरो पिकअपमध्ये कोंबून विक्रीसाठी नेताना गावकऱ्यांनी त्यांना पाठलाग करून पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. काल, २३ ऑगस्ट रोजी जळका तेली शिवारात हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जळका तेली (ता. खामगाव) येथील शेतकरी विनोद भाऊलाल चव्हाण यांनी याप्रकरणात तक्रार दिली आहे. जळका तेली, नागापूर, किन्ही महादेव येथील लोकांनी देव गायी म्हणून सोडलेल्या आहेत. अशा जवळपास १५ देवगायी नागापूर येथील सुपाजी वाकोडे यांच्याकडे चारण्यासाठी देण्यात आल्या होत्या. यातील ६-७ गायी सुपाजी वाकोडे याने गुपचूप विकून टाकल्याचे तक्रारीत म्हटले आहे. काल, २३ ऑगस्ट रोजी विनोद चव्हाण शेतात जात असताना त्यांना जळका तेली शिवारातील पडीत क्षेत्राजवळ सुपाजी वाकोडे व त्याचा मुलगा बाळू वाकोडे यांच्यासह चार जण बोलेरो पिकअप मध्ये गायी घेऊन जाताना दिसले.

चव्हाण यांनी लगेच फोनद्वारे ही माहिती गजानन चव्हाण, भगवान खांबेटकर, विलास पंडित चव्हाण यांना दिली. त्यानंतर बोलेरो पीकअप वाहनाला पाठलाग करून पकडण्यात आले तेव्हा गाडीतील बाळू वाकोडे पळून गेला. गाडीतील अन्य ५ जणांना पकडण्यात आले. पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या कामासाठी वापरण्यात आलेला बोलेरो पिकअप पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. शकील अहमद मो. जमील, शेख शाहरुख शेख वजीर या बाळापूरच्या व्यापाऱ्यांसह तेजराव मधोजी वानखेडे (रा. उमरा लासुरा, ता. खामगाव), सूर्यभान यादव गवारगुरु (रा. संभापूर, ता. खामगाव), सुपाजी किसन वाकोडे व बाळू सुपाजी वाकोडे अशा ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.