दुचाकीस्वार बुलडाणेकरांनो जरा ही बातमी वाचा… त्‍या दुर्लक्षामुळे अपघात, युवक गंभीर जखमी; बुलडाणा तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दुचाकीचे लायनर ब्लॉक झाल्याने अपघात झाला. यात दुचाकीवरून पडल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना काल, ६ ऑगस्टला सायंकाळी सुमारास मढजवळ (ता. बुलडाणा) घडली. विजय शंकर नरोटे (३५, रा. गुम्मी ता. बुलडाणा) असे जखमीचे नाव आहे. विजय नरोटे हे जाळीचा देव येथे शाईन मोटारसायकलने जात होते. त्यांच्या दुचाकीचे लायनर ब्लॉक …
 
दुचाकीस्वार बुलडाणेकरांनो जरा ही बातमी वाचा… त्‍या दुर्लक्षामुळे अपघात, युवक गंभीर जखमी; बुलडाणा तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दुचाकीचे लायनर ब्लॉक झाल्याने अपघात झाला. यात दुचाकीवरून पडल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना काल, ६ ऑगस्टला सायंकाळी सुमारास मढजवळ (ता. बुलडाणा) घडली. विजय शंकर नरोटे (३५, रा. गुम्मी ता. बुलडाणा) असे जखमीचे नाव आहे.

विजय नरोटे हे जाळीचा देव येथे शाईन मोटारसायकलने जात होते. त्यांच्या दुचाकीचे लायनर ब्लॉक झाल्याने ते जोरात पडले. यात त्यांच्या डोक्याला, पोटाला व पाठीला मोठा मार लागल्याने त्यांना लगेच बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, आपले वाहन सुस्‍थितीत ठेवणे गरजेचे असते. मात्र अनेक जण महिनोन्‌महिने गाडीची साधी सर्व्हिसिंगही करून घेत नाहीत. त्‍यामुळे अशा स्वरुपाचे अपघात घडू शकतात.