तो नियमातच होता, पण तरीही तिने त्याला बेदम चोपले!; ओठ फोडला!, तिला मिळाली अनेकांची साथ, त्यात इंगळे नावाचा एक माणूसही होता!!
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वीजबिल वसुलीसाठी आलेल्या पथकाला दाम्पत्याने लोटपोट केली. पथकातील महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला महिलेने बेदम मारहाण केली. यात त्याचे ओठ फुटले आहेत. ही घटना खामगाव शहरातील धोबी खदान भागात ३० सप्टेंबरला दुपारी दोनच्या सुमारास घडली.
सतिश आनंदराव खंडारे (३०, रा. श्यामलनगर खामगाव) हे खामगावला महावितरण कंपनीत वरिष्ठ तंत्रज्ञ आहेत. गेल्या महिन्यापासून थकीत विज बिल वसुलीचे आदेश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले आहेत. या वसुली पथकात त्यांचा सहभाग आहे. प्रमोद हेलोडे, नंदकिशोर तेलंग, सतिश इंगळे, नीलेश सपकाळ, श्रीकृष्ण झाल्टे यांच्यासह ३० सप्टेंबरला दुपारी दोनला ते धोबी खदान भागात बिल वसुलीसाठी गेले होते. ग्राहक सुरेश हिरामन बोरकर यांचे नाव यादीत असल्याने त्यांना थकीत विज बिल भरा, असे पथकाने सांगितले. तेव्हा त्यांनी दहा तारखेला विज बिल भरतो, असे म्हटले. मात्र नियमानुसार वीज बंद करावी लागेल, असे म्हणून पथकाने त्यांची वीज कापली. खंडारे हे वीज बंद करून खांबावरून उतरत नाही तोच सुरेश बोरकर व त्यांच्या पत्नीने शिविगाळ सुरू केली.
तेवढ्यावरच न थांबता नवराबायकोने मिळून खंडारे यांना तोंडावर, डोक्यात, पोटात चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे खंडारे यांचे ओठ फुटले. त्यांना वाचवायला सहकारी नीलेश सपकाळ धावले असता त्यांनाही बोरकरने लोटपोट केली. बोरकरच्या मदतीला बाकीचे लोकही धावले आणि त्यांनीही पथकाला लोटपोट करत मारहाण केली. नवराबायको आणि बाकीच्या सहा लोकांनी पुन्हा वीज कापायला आले तर जीवे मारून टाकू, अशी धमकी वसुली पथकाला दिली. तुम्ही पोलिसांत रिपोर्ट दिला तर मीही तुमच्याविरुध्द विनयभंगाचा रिपोर्ट देते, अशी धमक बोरकरच्या बायकोने दिली. खंडारे यांच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी बोरकर, त्याची बायको, इंगळे नावाचा माणूस आणि आणखी ५ लोकांविरुद्ध यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक श्री. सोळंके करत आहेत.