तू मला टॉर्चर करते, म्‍हणून मी शरीरसंबंध ठेवत नाही!; पतीचे सतत दूरदूर राहण्याचा खुलासा ऐकून हादरली पत्‍नी!; बुलडाण्यात पतीविरुद्ध गुन्‍हा दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लग्न झाल्याच्या पहिल्या दिवसापासून तो पत्नीपासून दूर दूर राहू लागला. पती-पत्नीच्या नात्याने तिच्याशी वागत नव्हता. तिने विचारले, तुम्ही माझ्यासोबत लग्न केल्यानंतर डिस्टर्ब का राहता? त्यावर त्याचा खुलासा ऐकून पत्नी अक्षरशः हादरली. “मला तू टार्चर करते. त्यामुळे मी तुझ्यासोबत कोणतेच शारीरिक संबंध ठेवू इच्छित नाही.’ असे तो म्हणाला. सासरच्यांना ही बाब …
 
तू मला टॉर्चर करते, म्‍हणून मी शरीरसंबंध ठेवत नाही!; पतीचे सतत दूरदूर राहण्याचा खुलासा ऐकून हादरली पत्‍नी!; बुलडाण्यात पतीविरुद्ध गुन्‍हा दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लग्‍न झाल्याच्या पहिल्या दिवसापासून तो पत्‍नीपासून दूर दूर राहू लागला. पती-पत्‍नीच्या नात्‍याने तिच्याशी वागत नव्हता. तिने विचारले, तुम्‍ही माझ्यासोबत लग्न केल्यानंतर डिस्‍टर्ब का राहता? त्‍यावर त्‍याचा खुलासा ऐकून पत्‍नी अक्षरशः हादरली. “मला तू टार्चर करते. त्यामुळे मी तुझ्यासोबत कोणतेच शारीरिक संबंध ठेवू इच्छित नाही.’ असे तो म्‍हणाला. सासरच्यांना ही बाब सांगितल्यानंतर त्‍यांनीही दूर्लक्ष केले. उलट स्वतःचा बिझनेस करण्यासाठी माहेरावरून ५ लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी सुरू झाली. त्‍यासाठी छळ सुरू झाला. मारहाण केली जाऊ लागली. अखेर तिचा घरातून हाकलले. या प्रकरणी २५ वर्षीय विवाहितेने बुलडाणा शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली असून, त्‍यावरून पोलिसांनी पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

पती योगेश साहेबराव जाधव याच्‍यासह सासरे साहेबराव यशवंतराव जाधव, सासू अंकिता साहेबराव जाधव, जेठ विनोद साहेबराव जाधव, वैष्णवी विनोद जाधव, मामेसासरे गणपत बापुराव गुळमकर (सर्व रा. विष्णूनगर, जवाहर कॉलनी, औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात काल, २१ सप्‍टेंबरला सौ. हर्षा योगेश जाधव (रा. विष्णूनगर, औरंगाबाद , ह. मु. रा. अष्टविनायकनगर, सर्क्यूलर रोड, बुलडाणा) या विवाहितेने तक्रार दिली. तक्रारीत म्‍हटले आहे, की तिचे लग्‍न योगेशसोबत २५ फेब्रुवारी २०१८ रोजी चिखलीच्या मौनी बाबा संस्थानमध्ये झाले होते. लग्नाच्‍या पहिल्या दिवसापासून तिचा पती योगेश तिच्‍यासोबत पती- पत्नी या नात्याने वागत नव्हता.

तिने त्‍याच्या वागण्यात बदल होईल यासाठी वाट बघितली. सासरे साहेबराव जाधव, सासू अंकीता जाधव यांनाही पतीचे वागणे सांगितले. मात्र त्‍यांनी दूर्लक्ष केले. उलट तू व्यवस्‍थित वाग नाहीतर जीवे मारून टाकू, अशा धमक्या दिल्या. मामे सासऱ्यानेही तिलाच पती ज्या पध्दतीने वागवतो त्याच पध्दतीने रहा, असे म्हणाले. जेठ विनोद साहेबराव जाधव व त्यांची पत्नी सौ. वैष्णवी ऊर्फ गिता विनोद जाधव यांनीसुध्दा पती जसे वागवतो तसेच रहा, असे म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. लग्नात मनाप्रमाणे हुंडा व मानपान तसेच आंदन दिले नाही, असे म्हणून नंतर त्‍यांनी अपमान करणे सुरू केले.

पती योगेशने तिला स्वतःचा बिझनेस करण्यासाठी माहेरवरून पाच लाख रुपये आण, असे म्‍हणून शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. सासू-सासऱ्यांनीही चापटा बुक्‍क्यांनी मारहाण केली. तू जर पैसे आणले नाही तर घरात राहू नको, नाहीतर जिवाने मारून टाकेन, अशा धमक्या दिल्या. ३ मे २०२१ रोजी हा सासरच्यांकडून होणाऱ्या छळामुळे नातेवाइकांची बैठक होऊन सासरच्यांकडून नोटरीवर मुलीला व्यवस्‍थित वागवू, असे लिहून घेण्यात आले. मात्र नंतरही दोन दिवस चांगली वागणूक देऊन परत सासरच्यांनी छळ मांडला. नंतर घरातून हकलून दिले, असे विवाहितेने तक्रारीत म्‍हटले आहे.