“तुमच्यावर माझे मन आले’ म्हणत शेतमालकाने धरला तिचा हात!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतात काम करताना शेतमालकाने विनयभंग केल्याची तक्रार ४५ वर्षीय मजूर महिलेने काल, १८ ऑगस्ट रोजी बोराखेडी पोलीस ठाण्यात केली. राजूर (ता. मोताळा) येथे ही घटना १७ ऑगस्टला घडली. खडकी (ता. मोताळा) येथील पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती वर्षभरापासून गावातीलच राहुल पवार याच्या राजूर येथील शिवारात मजुरी करते. १७ ऑगस्ट रोजी महिला …
Aug 20, 2021, 11:27 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतात काम करताना शेतमालकाने विनयभंग केल्याची तक्रार ४५ वर्षीय मजूर महिलेने काल, १८ ऑगस्ट रोजी बोराखेडी पोलीस ठाण्यात केली. राजूर (ता. मोताळा) येथे ही घटना १७ ऑगस्टला घडली.
खडकी (ता. मोताळा) येथील पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती वर्षभरापासून गावातीलच राहुल पवार याच्या राजूर येथील शिवारात मजुरी करते. १७ ऑगस्ट रोजी महिला खुरपणी करण्यासाठी शेतात गेली होती. काम करताना शेतमालक राहुल तिथे आला व तिला म्हणाला, की “तुम्ही मला खूप आवडता. माझे तुमच्यावर मन आले आहे’. त्यानंतर त्याने तिचा वाईट उद्देशाने हात धरला व दोन्ही हातांनी कवटाळले. महिलेने प्रतिकार केला असता त्याने ओढाताण केली व मारहाण केली, अशी तक्रार महिलेने केली आहे. तक्रारीवरून राहुल पवारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.