तीन महिला नाल्यात गेल्या वाहून, दोघी बचावल्या, एकीचा शोध सुरू; सिंदखेड राजा तालुक्‍यातील घटना

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा शहराजवळील भालदारा शिवारातील बंधाऱ्याजवळ भाजीपाला आणण्यास्ााठी गेलेल्या तीन महिला नाल्यात वाहून गेल्या. सुदैवाने दोघींनी निंबाच्या झाडाला धरून ठेवल्याने वाचल्या. मात्र तिसरी ४० वर्षीय महिला वाहून गेली. ही घटना आज, ७ सप्टेंबरला सायंकाळी घडली. मंगला गणेश शिंगणे या वाहून गेल्या असून, संगिता संतोष शिंगणे (२९) व वनिता शिंगणे …
 
तीन महिला नाल्यात गेल्या वाहून, दोघी बचावल्या, एकीचा शोध सुरू; सिंदखेड राजा तालुक्‍यातील घटना

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा शहराजवळील भालदारा शिवारातील बंधाऱ्याजवळ भाजीपाला आणण्यास्‍ााठी गेलेल्या तीन महिला नाल्यात वाहून गेल्या. सुदैवाने दोघींनी निंबाच्‍या झाडाला धरून ठेवल्याने वाचल्या. मात्र तिसरी ४० वर्षीय महिला वाहून गेली. ही घटना आज, ७ सप्‍टेंबरला सायंकाळी घडली.

मंगला गणेश शिंगणे या वाहून गेल्या असून, संगिता संतोष शिंगणे (२९) व वनिता शिंगणे (२५) या सख्ख्या बहिणी बचावल्या आहेत. त्‍यांना पावसाचा अंदाज आला नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍यावर हे संकट कोसळले. संगिता आणि वनिता यांची मंगला या काकू आहेत. रहिवाशांना ही घटना कळताच त्‍यांनी मदतीसाठी धाव घेतली. पोलीस कर्मचारीही घटनास्‍थळी धावले. सिंदखेड राजाचे तहसीलदार सुनील सावंत, ठाणेदार केशव वाघ, नगरसेवक गौतम खरात, दीपक भालेराव यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन शोध मोहीम सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. रात्री दहापर्यंतही त्‍या मिळून आल्या नव्हत्‍या.