जिल्ह्यात “आयुष्मान भारत पंधरवडा’; ३० सप्टेंबरपर्यंत रुग्णांना लाभ!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आयुष्मान भारत पंधरवडा सुरू झाला असून, ३० सप्टेंबरपर्यंत तो चालणार आहे. मोफत उपचारासाठी एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे. आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी देशामध्ये इतर राज्यांत देखील उपचार घेऊ शकतात. इतर राज्यांतील लाभार्थी देखील महाराष्ट्रातील अंगीकृत रुग्णालयांत उपचार घेऊ शकतात, हे विशेष.
जिल्ह्यात योजनेत २५ अंगीकृत रुग्णालये असून, येथे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वाटप मोफत सुरू आहे. पात्र कुटूंब निवड अधिकार केवळ केंद्र शासनाला आहे. लाभार्थ्यांनी आपले गोल्ड कार्ड तयार करून घ्यावे. नागरिकांनी सीएससी सेतू केंद्र, नागरी सुविधा कॉमन सर्व्हिस सेंटर, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्र चालक देखील आयुषमान भारत गोल्ड कार्ड वितरित करत आहेत. आयुषमान भारत गोल्ड कार्ड प्राप्त करण्यासाठी आरोग्य मित्राकडून शिधापत्रिकेच्या आधारे व आधार कार्ड किंवा प्रधानमंत्री यांच्याकडून आलेले निमंत्रण पत्र किंवा इतर शासकीय फोटो ओळखपत्र याच्या माध्यमातून कार्ड प्राप्त करू शकतात. जास्तीत जास्त नागरिकांनी गोल्डन कार्ड प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
योजनेच्या लाभासाठी संपर्क करावा
योजनेच्या माहितीसाठी 1800111565 या क्रमांकावर संपर्क करावा किंवा आरोग्य मित्रास भेटावे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेसाठी 18002332200 वर संपर्क करावा. निवडक रुग्णालयात मोफत उपचार रुग्ण घेऊ शकता. जिल्ह्यातील योजनेमधील २५ अंगीकृत रुग्णालयात मोफत आयुष्मान भारतचे कार्ड वाटप सुरू आहे. जिल्ह्यातील २ लक्ष ७६ हजार ७०४ पात्र कुटुंबांसाठी आयुष्मान भारतचे कार्ड वाटप सुरू आहे.
ही आहेत जिल्ह्यातील अंगीकृत रूग्णालये
जिल्हा रुग्णालय बुलडाणा, सामान्य रुग्णालय खामगाव, उपजिल्हा रुग्णालय शेगाव, ग्रामीण रुग्णालय सिंदखेड राजा, ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा, उपजिल्हा रुग्णालय मलकापूर, साई बाल रुग्णालय खामगाव, ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद, ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल,माऊली डायलिसिस सेंटर शेगाव, मेहेत्रे हॉस्पिटल बुलडाणा, संचेती हृदयालय हॉस्पिटल बुलडाणा, अमृत हृदयालय हॉस्पिटल बुलडाणा, चोपडे हॉस्पिटल मलकापूर, कोलते हॉस्पिटल मलकापूर, आस्था हॉस्पिटल मलकापूर, मानस हॉस्पिटल मलकापूर, मेहकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मेहकर, राठोड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मेहकर, सिटी हॉस्पिटल बुलडाणा, सोनटक्के हॉस्पिटल खामगाव, सिल्वरसिटी हॉस्पिटल खामगाव (केवळ डायलिसिस व आयुष्मान भारत कार्ड गोल्ड कार्ड साठी ), धनवे हॉस्पिटल चिखली, तुळजाई हॉस्पिटल चिखली, कोठारी हॉस्पिटल चिखली.