जळगाव जामोदमध्ये पती-पत्‍नीचा राडा!; परस्परविरोधी तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्‍हा दाखल

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पती-पत्नीचे भांडण झाले. तिच्या माहेरच्यांनी त्यात सहभाग घेतल्याने दोघे जण जखमी झाले. ही घटना वाडी (ता. जळगाव जामोद) येथे ६ सप्टेंबरला रात्री दहाच्या सुमारास घडली. जळगाव जामोद पोलिसांनी पती-पत्नीसह पत्नीच्या माहेरच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पती ज्ञानेश्वर दत्तात्रय पडूळकर याच्या तक्रारीवरून सासू सौ.आशा मुरलीधर महामुने, साला राधेशाम मुरलीधर …
 
जळगाव जामोदमध्ये पती-पत्‍नीचा राडा!; परस्परविरोधी तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्‍हा दाखल

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पती-पत्‍नीचे भांडण झाले. तिच्‍या माहेरच्यांनी त्‍यात सहभाग घेतल्याने दोघे जण जखमी झाले. ही घटना वाडी (ता. जळगाव जामोद) येथे ६ सप्‍टेंबरला रात्री दहाच्‍या सुमारास घडली. जळगाव जामोद पोलिसांनी पती-पत्‍नीसह पत्‍नीच्‍या माहेरच्या दोघांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

पती ज्ञानेश्वर दत्तात्रय पडूळकर याच्‍या तक्रारीवरून सासू सौ.आशा मुरलीधर महामुने, साला राधेशाम मुरलीधर महामुने व पत्‍नी सौ. रेणुका ज्ञानेश्वर पडूळकर या तिघांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे, तर सौ. रेणुकाच्‍या तक्रारीवरून ज्ञानेश्वरविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. ज्ञानेश्वरने तक्रारीत म्‍हटले आहे, की तो मूळचा मेहकर तालुक्‍यातील घाटबोरीचा आहे. सध्या जळगाव जामोदच्या कृष्णानगरात भाड्याने राहतो. मिस्‍त्री काम करतो. त्‍याचे लग्न २०१० साली झाले आहे. त्‍यांना एक १० वर्षांची मुलगी आहे. पोळा सणाच्‍या दिवशी तो सासऱ्यांकडे पत्‍नी व मुलीसह जेवण करण्यास आला होता. जेवणानंतर घरी निघाला असता पत्‍नीला घरी चल असे म्‍हणाला. मात्र पत्‍नीने मी तुमच्यासोबत येत नाही, असे सांगितले. त्‍यावरून वाद होऊन साला राधेश्याम, पत्‍नी रेणुका व सासूने शिविगाळ करून चापटा- बुक्क्यांनी मारहाण केली. मुलीला तुमच्यासोबत पाठवत नाही. तिला दुसरा नवरा करून देईल, असे सासू म्‍हणाली. साला राधेश्यामने काठी घेऊन डोक्यावर मारली. त्यामुळे डोके फुटल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. त्‍यावरून पोलिसांनी सासू, पत्‍नी व साल्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला.

. रेणुकाने दिलेल्या तक्रारीत म्‍हटले आहे, की पती ज्ञानेश्वर नेहमी दारू पिऊन वाद घालतो व भांडण करतो. त्‍यामुळे मुलीसह आईच्या घरी वाडी (ता. जळगाव जामोद) येथे राहण्यास आली. १५ दिवसांपूर्वी पती ज्ञानेश्वरही जळगाव जामोदला आला. त्‍यामुळे आम्‍ही भाड्याने वेगळी रूम करून राहू लागलो. पोळ्याच्‍या दिवशी मी माहेरी असताना ज्ञानेश्वर तिथे दारू पिऊन आला. घराच्‍या दरवाजाला लाथ मारली. त्‍यामुळे मी, माझा भाऊ व आई घराबाहेर आलो. आम्हाला पाहताच त्‍याने शिविगाळ केली. आईच्‍या अंगावर मारण्यास धावला. भाऊ राधेशामने त्याला आवरण्याचा प्रयत्न केला असता भावाचे डाव्या हाताच्या अंगठ्याला चावा घेतला. अंगणात पडलेली वीट भावाच्‍या पायावर मारली. मी आवरायला गेली असता तुम्हाला सर्वांना हिसकाच दाखवतो, असे म्हणून शिविगाळ केली. विष घेतो व तुम्‍हाला फसवतो, अशी धमकी दिली, असे तक्रारीत रेणुकाने म्‍हटले आहे. त्‍यावरून पोलिसांनी ज्ञानेश्वरविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.