जळगाव जामोदच्या धान्य व्यापाऱ्याला ४ लाखांनी गंडा!

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः धान्याच्या एजंटला मका पाठवायला सांगून गंडवल्याची घटना जळगाव जामोदमध्ये समोर आली आहे. तब्बल २५२ क्विंटल मका या एजंटने अहमदाबादला पाठवला होता. मात्र त्यापोटी द्यायचे ४ लाख २० हजार ५७० रुपये त्याला देण्यात आलेच नाहीत. ज्या पत्त्यावर मका पाठवला तो पत्ताही फेक असल्याचे नंतर एजंटला कळाले. जळगाव जामाेद पोलिसांनी धान्य …
 
जळगाव जामोदच्या धान्य व्यापाऱ्याला ४ लाखांनी गंडा!

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः धान्याच्‍या एजंटला मका पाठवायला सांगून गंडवल्याची घटना जळगाव जामोदमध्ये समोर आली आहे. तब्‍बल २५२ क्विंटल मका या एजंटने अहमदाबादला पाठवला होता. मात्र त्‍यापोटी द्यायचे ४ लाख २० हजार ५७० रुपये त्‍याला देण्यात आलेच नाहीत. ज्‍या पत्त्यावर मका पाठवला तो पत्ताही फेक असल्याचे नंतर एजंटला कळाले. जळगाव जामाेद पोलिसांनी धान्य एजंटच्‍या तक्रारीवरून दोघांविरुद्ध काल, ११ ऑगस्‍टला गुन्‍हा दाखल केला आहे.

गिरिश जानवी (कन्व्हन्सिंग एजंट वाशी मुंबई) व भ्रतेष जानी (हनुमंत ग्रो फूड इंडस्ट्रीज बारेजा, अहमदाबाद, रा. प्रेरणा सोसायटी नम्रता सोसायटीजवळ अहमदाबाद) अशी आरोपींची नावे आहेत. राजेंद्रकुमार घनश्यामदास गांधी यांचा जळगाव जामोदमध्ये आर. जी. गांधी ग्रेन मर्चंट व कमिशन एजंट नावाने व्यवसाय असून, ते शेतमाल खरेदी- विक्री करतात. धान्याच्‍या व्यापाऱ्यांना ते मागणीनुसार धान्य (मका, गहू, ज्‍वारी, सोयाबीन, तूर, हरभरा) पुरवत असतात. गिरिश जानवी आणि भ्रतेश जानी हे मका प्रक्रिया उद्योगाला धान्य पुरवतात. त्‍यांच्‍याशी राजेंद्र गांधी यांचा ५ ऑगस्‍ट २०२१ ला कमिशन व्यवहार ठरला होता.

त्‍यानुसार त्‍यांनी दोघांच्‍या बोलण्यावर विश्वास ठेवून ६ फेब्रुवारीला १६६५ रुपये प्रतिक्विंटल दराने अहमदाबादजवळील हनुमंत ग्रो फूड इंडस्ट्रीज, बारेजा येथे २५२ क्विंटल मका (किंमत ४ लाख २० हजार ५८० रुपये) ट्रकने (क्र जीजे ०३ एडब्लू ४७२६) पाठवला होता. हा मका २८ ऑगस्‍टला त्‍यांना मिळालासुद्धा. तसे त्‍यांनी फोनद्वारे कळवले. व्यवहार रोखीने असल्याने गांधी यांना पैशाची मागणी केली असता त्‍यांनी आठ दिवसांत पैसे पाठविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र १५ ते २० दिवस उलटूनही त्‍यांनी पैसे पाठवले नाहीत. त्‍यानंतर त्‍यांनी फोन उचलणेही बंद केले. राजेंद्र गांधी हे प्रत्यक्ष त्‍यांनी दिलेल्या पत्त्यावर गेले असता तिथे दोघेही मिळून आले नाहीत. त्यांनी इतर लोकांनासुध्दा अशा पद्धतीने फसवल्याचे गांधी यांना कळले. त्‍यांनी गांधी यांनी जळगाव जामाेद पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. त्‍यावरून पोलिसांनी गिरिश जानवी आणि भ्रतेष जानी यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे.