गैरव्यवहाराचे आरोप करत चंदनपूरचे ग्रामस्थ पाण्याच्या टाकीसमोर बसले उपोषणाला!
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राष्ट्रीय पेयजल ग्रामीण योजनेच्या कामांत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत या कामांची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी चंदनपूर (ता. चिखली) येथील ग्रामस्थांनी केली असून, पाण्याच्या टाकीसमोर उपोषण सुरू केले आहे. काल, २४ सप्टेंबरपासून सुरू झालेले उपोषण आज, २५ सप्टेंबरलाही सुरू होते. विनोद इंगळे, देविदास इंगळे, आत्माराम इंगळे, …
Sep 25, 2021, 18:19 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राष्ट्रीय पेयजल ग्रामीण योजनेच्या कामांत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत या कामांची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी चंदनपूर (ता. चिखली) येथील ग्रामस्थांनी केली असून, पाण्याच्या टाकीसमोर उपोषण सुरू केले आहे. काल, २४ सप्टेंबरपासून सुरू झालेले उपोषण आज, २५ सप्टेंबरलाही सुरू होते. विनोद इंगळे, देविदास इंगळे, आत्माराम इंगळे, विष्णू पुरी यांच्यासह अन्य ग्रामस्थांसह उपोषणकर्त्यांत समावेश आहे.