“गे’ लोकांचे फोन, अश्लील व्हिडिओ कॉल येत असल्याने लाखनवाड्याचा तरुण हैराण-परेशान!; करताहेत अश्लील हावभाव; पोलिसांत धाव!!

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः त्याला एकाएकी गे (पुरुष समलिंगी) लोकांचे फोन येऊ लागले, रात्री-बेरात्री व्हिडिओ कॉल येऊ लागले… त्याला तो हैराण-परेशान झाला… २६ ऑगस्टपासून त्याचा असा छळ सुरू होता… अखेर त्याने असह्य झाल्याने हिवरखेड पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. लाखनवाडा (ता. खामगाव) येथील ३० वर्षीय व्यक्तीसोबत हा प्रकार घडला आहे. झाले असे, की …
 
“गे’ लोकांचे फोन, अश्लील व्हिडिओ कॉल येत असल्याने लाखनवाड्याचा तरुण हैराण-परेशान!; करताहेत अश्लील हावभाव; पोलिसांत धाव!!

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः त्‍याला एकाएकी गे (पुरुष समलिंगी) लोकांचे फोन येऊ लागले, रात्री-बेरात्री व्हिडिओ कॉल येऊ लागले… त्‍याला तो हैराण-परेशान झाला… २६ ऑगस्‍टपासून त्‍याचा असा छळ सुरू होता… अखेर त्‍याने असह्य झाल्याने हिवरखेड पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. लाखनवाडा (ता. खामगाव) येथील ३० वर्षीय व्‍यक्‍तीसोबत हा प्रकार घडला आहे.

झाले असे, की कुणीतरी भामट्याने या तरुणाच्‍या नावाने (बदनामी होऊ नये म्‍हणून नावाची गोपनीयता बाळगत आहोत.) गे लोकांसाठी असलेल्या ॲपवर अकाऊंट उघडले. त्‍यावर या तरुणाचा नंबर टाकला. त्‍यामुळे त्‍याला अचानक कॉल, व्हिडिओ कॉल येणे सुरू झाले. हा तरुण एका कंपनीत काम करतो. गे लोक त्‍याला व्हिडिओ कॉल करून अश्लील हावभाव करतात. एकाने तर अश्लील स्‍क्रिनशॉट पाठवला. खातरजमा केली असता कुणीतरी आपल्या नावाने आपल्या नंबरच्‍या साह्याने गे लोकांच्‍या ॲपवर नोंदणी केल्याचे त्‍याला कळले. वैतागून तरुणाने लगेच हिवरखेड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आता भामट्याचा शोध सुरू केला आहे. तपास एपीआय श्री. वाघ करत आहेत.