खामगावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; दोन घरे फोडली!

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : खामगाव शहरात दोन घरे फोडून एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. घरफोडीची पहिली घटना काल, १८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पाचला तर दुसरी घटना आज, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी सहाला समोर आली. संकेत संजय जोशी (३२, रा. वृंदावन हील, खामगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ ऑक्टोबर रोजी …
 
खामगावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; दोन घरे फोडली!

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : खामगाव शहरात दोन घरे फोडून एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. घरफोडीची पहिली घटना काल, १८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पाचला तर दुसरी घटना आज, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी सहाला समोर आली.

संकेत संजय जोशी (३२, रा. वृंदावन हील, खामगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ ऑक्टोबर रोजी ते परिवारासह बाहेरगावी गेले होते. काल १८ ऑक्टोबर रोजी ते सायंकाळी ५ वाजता घरी परतले असता त्यांना घरामागील दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरातील लोखंडी कुलूप फोडून चोरट्यांनी रोख ४ हजार रुपये, लहान मुलांच्या हातातील कडे व तोरड्या ६० ग्रॅम किंमत ३००० हजार रुपये असा एकूण ७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. शहर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास पोहेकाँ कांशीराम जाधव करीत आहेत.

घरफोडीची दुसरी घटना शेलोडी रोडवरील चांदमारी घरकुल परिसरात आज सकाळी उघडकीस आली. वैभव चंद्रसिंग चव्हाण काल रात्री परिवारासह घरात झोपले. सकाळी झोपेतून उठल्यानंतर त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त दिसले. रात्री घराचे दार उघडे असल्याने चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडले. लॉकरमधील लहान मुलाच्या अंगावरील सोन्याची अंगठी, ओम, करदोडा किंमत १० हजार, २०० ग्रॅम वजनाचे चांदीचे कडे किंमत ६ हजार, सोयाबीन विकून आलेले ४७ हजार रुपये असा एकूण ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. खामगाव शहर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक इलामे करीत आहेत.