कोरोनाचे नवे दोन रुग्‍ण आढळले!; पाच जणांना रुग्‍णालयातून सुटी!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 27 सप्टेंबरला कोरोनाचे नवे दोन पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत, तर पाच रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या रुग्णालयांत 17 रुग्ण उपचार घेत आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 204 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 202 अहवाल कोरोना निगेटिव्ह …
 
कोरोनाचे नवे दोन रुग्‍ण आढळले!; पाच जणांना रुग्‍णालयातून सुटी!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 27 सप्‍टेंबरला कोरोनाचे नवे दोन पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आले आहेत, तर पाच रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज मिळाला आहे. सध्या रुग्‍णालयांत 17 रुग्‍ण उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 204 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 202 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 2 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 128 तर रॅपिड टेस्टमधील 74 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
चिखली शहर : 1, चिखली तालुका : शेलूद 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 2 रुग्ण आढळले आहेत. वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे उपचाराअंती 5 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 716817 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86874 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 444 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87564 कोरोनाबाधित रुग्ण असून, आजपर्यंत 673 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.