कॉलेजला जाते सांगून गेलेली तरुणी परतलीच नाही…; खामगाव शहरातील घटना
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जीएस कॉलेजला जाते असे सांगून घराबाहेर पडलेली २२ वर्षीय तरुणी घरी परतलीच नाही. काल, ४ ऑगस्टला दुपारी १२ ला ती कॉलेजला गेली होती. आज, ५ ऑगस्टला तिच्या आईने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून मुलगी हरवल्याची तक्रार दिली आहे. रानी हनीफ चौधरी (रा. बर्डे प्लॉट) असे तरुणीचे नाव असून, तिची आई शुगराबी …
Aug 5, 2021, 18:02 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जीएस कॉलेजला जाते असे सांगून घराबाहेर पडलेली २२ वर्षीय तरुणी घरी परतलीच नाही. काल, ४ ऑगस्टला दुपारी १२ ला ती कॉलेजला गेली होती. आज, ५ ऑगस्टला तिच्या आईने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून मुलगी हरवल्याची तक्रार दिली आहे. रानी हनीफ चौधरी (रा. बर्डे प्लॉट) असे तरुणीचे नाव असून, तिची आई शुगराबी हनीफ चौधरी यांनी सगळीकडे तिचा शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. रंग सावळा, बांधा मजबूत, उंची ५.२ फूट, अंगात हिरवा कुर्ता, पिवळा सलवार व पिवळा दुपट्टा असे तिचे वर्णन आहे. तपास पोहेकाँ विजय उभे करत आहेत.