कॉलेज तरुणीची छेड काढणाऱ्या मो. ताबिशला जमावाने धो धो धुतले; मलकापूर बसस्थानकावरील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापूर बसस्थानकावर काल, ११ ऑगस्टला दुपारी चारच्या सुमारास तरुणाने कॉलेज तरुणीची छेड काढली. तरुणी रडत असल्याचे पाहून लोक जमले. त्यांनी तिची विचारपूस केली असता तिने हकीकत सांगितली. त्यानंतर संतप्त लोकांनी छेड काढणाऱ्या २० वर्षीय मोहम्मद ताबिश मोहम्मद रफिक (रा. पारपेठ मलकापूर) याला पकडून बेदम चोपले. तरुणीच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध मलकापूर शहर …
 
कॉलेज तरुणीची छेड काढणाऱ्या मो. ताबिशला जमावाने धो धो धुतले; मलकापूर बसस्थानकावरील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापूर बसस्‍थानकावर काल, ११ ऑगस्‍टला दुपारी चारच्‍या सुमारास तरुणाने कॉलेज तरुणीची छेड काढली. तरुणी रडत असल्याचे पाहून लोक जमले. त्‍यांनी तिची विचारपूस केली असता तिने हकीकत सांगितली. त्‍यानंतर संतप्‍त लोकांनी छेड काढणाऱ्या २० वर्षीय मोहम्मद ताबिश मोहम्मद रफिक (रा. पारपेठ मलकापूर) याला पकडून बेदम चोपले. तरुणीच्‍या तक्रारीवरून त्‍याच्‍याविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला असून, अटकही करण्यात आली.

मलकापूर तालुक्यातील एका गावातील तरुणी कॉलेज आटोपून गावी जाण्यासाठी बसस्थानकावर आली होती. त्यावेळी मोहम्मद ताबिशने तिच्याकडे बघून अश्लील हावभाव केले व तिची छेड काढली. या प्रकारामुळे घाबरून गेलेली तरुणी रडू लागली. ते पाहून बसस्थानकावरील नागरिकांनी तिची विचारपूस केली. तेव्‍हा तिने घडलेला प्रकार सांगितला. यावेळी जमलेल्या जमावाने ताबिशला पकडून विचारणा केली. त्‍याने उडवाउडवीची उत्तरे देणे सुरू केल्याने जमावाने त्‍याला लाथाबुक्‍क्यांनी बेदम मारहाण केली. घटनेनंतर तरुणीने मलकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ताबिशला काल रात्रीच पोलिसांनी अटक केली आहे.