किनगाव राजा पोलिसांनी ४८ तासांत पकडला मोटारपंप चोर!
सिंदखेड राजा (बाळासाहेब भाेसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः किनगाव राजा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत गोपनीय माहितीच्या आधारे विहिरीतील मोटारपंप चोरून नेणाऱ्यास त्यानेही गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. सोयंदेव (ता. सिंदखेड राजा) येथे ही घटना समोर आली होती. या प्रकरणी १५ सप्टेंबरला शिवनारायण दत्तात्रय नागरे यांनी तक्रार दिली होती. ठाणेदार युवराज रबडे यांनी तपासाची चक्रे वेगाने …
Sep 19, 2021, 19:07 IST
सिंदखेड राजा (बाळासाहेब भाेसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः किनगाव राजा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत गोपनीय माहितीच्या आधारे विहिरीतील मोटारपंप चोरून नेणाऱ्यास त्यानेही गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. सोयंदेव (ता. सिंदखेड राजा) येथे ही घटना समोर आली होती. या प्रकरणी १५ सप्टेंबरला शिवनारायण दत्तात्रय नागरे यांनी तक्रार दिली होती.
ठाणेदार युवराज रबडे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत १६ सप्टेंबरला राजीव दत्तात्रय खरात (रा. जांभोरा, ता. सिंदखेड राजा) यास अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने १८ सप्टेंबरला गुन्ह्याची कबुली दिली. विहिरीतून चोरलेले २ मोटारपंप संच त्याने पंचासमक्ष काढून दिले. हा तपास ठाणेदार श्री. रबडे यांच्या नेतृत्वात पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक चाटे, गजानन सानप, श्रावण डोंगरे, शिवाजी बारगजे करत आहेत.