कर्जाचा डोंगर वाढत गेला… हताश शेतकऱ्याने घेतला गळफास!
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कर्जाचा वाढता डोंगर, त्यात सततची नापिकी आणि कर्ज फेडता येत नसल्याची सल… यामुळे नैराश्याने ग्रासलेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मासरूळ (ता. चिखली) येथे १० सप्टेंबरला घडली. रमेश विनायकराव देशमुख (५२) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. देशमुख यांच्याकडे चिखली अर्बन बँकेचे ५० हजार रुपयांचे कर्ज होते. याशिवाय अन्य …
Sep 13, 2021, 09:50 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कर्जाचा वाढता डोंगर, त्यात सततची नापिकी आणि कर्ज फेडता येत नसल्याची सल… यामुळे नैराश्याने ग्रासलेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मासरूळ (ता. चिखली) येथे १० सप्टेंबरला घडली.
रमेश विनायकराव देशमुख (५२) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. देशमुख यांच्याकडे चिखली अर्बन बँकेचे ५० हजार रुपयांचे कर्ज होते. याशिवाय अन्य काही खासगी गटांचेही कर्ज होते. शेती बिनभरवशाचा धंदा झाल्याने त्यांनी जोडधंदा म्हणून भाड्याने देण्यासाठी कार घेतली होती. या कारचेही कर्ज थकल्याने फायनान्स कंपनीने ती ओढून नेली होती. त्यानंतर त्यांनी आणखी एक गाडी घेतली. मात्र कोरोनामुळे तिचेही हप्ते भरता आले नव्हते. यातूनच त्यांनी गळफास घेतल्याचे त्यांच्या कौटुंबिक सूत्रांनी सांगितले.