अनुसूचित जाती कल्याण समितीने घेतला नगरपालिका, महसूल विभागाचा आढावा; पूरग्रस्तांना मदत, नुकसानीचीही घेतली माहिती

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महाराष्ट्र विधिमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समिती आजपासून 6 ऑक्टोबरपर्यंत जिल्हा दौऱ्यावर आली आहे. समितीने दौऱ्याच्या पहिल्या दिवशी आज, 4 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात बैठक घेतली. यावेळी विविध विभागांचा आढावा घेण्यात आल. व्यासपीठावर विधानसभा सदस्य तथा समितीप्रमुख कु. प्रणिती शिंदे, विधानसभा सदस्य तथा समिती सदस्य यशवंत माने, लहू कानडे, …
 
अनुसूचित जाती कल्याण समितीने घेतला नगरपालिका, महसूल विभागाचा आढावा; पूरग्रस्तांना मदत, नुकसानीचीही घेतली माहिती

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महाराष्ट्र विधिमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समिती आजपासून 6 ऑक्टोबरपर्यंत जिल्हा दौऱ्यावर आली आहे. समितीने दौऱ्याच्या पहिल्या दिवशी आज, 4 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात बैठक घेतली. यावेळी विविध विभागांचा आढावा घेण्यात आल. व्यासपीठावर विधानसभा सदस्य तथा समितीप्रमुख कु. प्रणिती शिंदे, विधानसभा सदस्य तथा समिती सदस्य यशवंत माने, लहू कानडे, लखन मलिक, सुनील कांबळे, नामदेव ससाणे, अरूण लाड, राजेश राठोड आदी उपस्थित होते. तसेच विधानमंडळ सचिवालयातील अवर सचिव प्र. श्री. खोंदले, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, कक्ष अधिकारी विनोद राठोड, सहायक कक्ष अधिकारी दत्तात्रय बेंगलवार आदीही उपस्थित होते.

अनुसूचित जाती कल्याण समितीने घेतला नगरपालिका, महसूल विभागाचा आढावा; पूरग्रस्तांना मदत, नुकसानीचीही घेतली माहिती

समितीने सर्वप्रथम जिल्ह्यात गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. समितीला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी जिल्ह्यातील पीक नुकसानीची माहिती दिली. समितीने नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीची देता येणारी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी पडझड झालेल्या घरांची, मृत पावलेल्या व्यक्ती व दिलेल्या नुकसान भरपाईची माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक आयुक्त श्रीमती राठोड यांनी प्रास्ताविक केले. समितीने जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयातील अनुसूचित जाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची बढती, पदोन्नती, अनुशेष, रिक्त पदे, बिंदुनामावली आदींचा आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर जिल्ह्यातील मलकापूर, मेहकर, लोणार, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, बुलडाणा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, चिखली व नांदुरा नगर पालिकांमधील व मोताळा, संग्रामपूर नगर पंचायतीमधील अनुसूचित जाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचा भरती, अनुशेष, पदोन्नतीचा आढावा घेतला. तसेच नगर पालिका व नगर पंचायतीमध्ये दलित वस्ती विकास योजना, अनुसूचित जाती प्रवर्गाच्या कल्याणासाठी राबविण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेतला. बैठकीला सर्व विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा परिषद, समाज कल्याण विभागाचा आढावा
महाराष्ट्र विधान मंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने जिल्हा परिषदेच्या श्री. छत्रपती शिवाजी सभागृहात जिल्हा परिषदेकडील यंत्रणा व समाज कल्याण विभागाचा आढावा घेतला. समितीने जिल्हा परिषदेकडील समाज कल्याण, कृषि, पशुसंवर्धन, आरोग्य, महिला व बालकल्याण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, शिक्षण, पंचायत विभागातील अनुसूचीत जाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची बढती, पदोन्नती, आरक्षण, बिंदूनामावली, पदभरती बाबत आढावा घेतला. तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कडील दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना, शिष्यवृत्ती, वसतिगृह आदींविषयी चर्चा केली. जिल्हा परिषदेकडील समाज कल्याण विभागातंर्गत राबविण्यात येणाऱ्या आंतरजातीय विवाह योजना, वसतिगृह, महात्मा ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती योजना, जि.प सेस फंडमधील मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजनांचा आढावाही घेतला. पशुसंवर्धन विभागाकडील दुधाळ जनावरे वाटप, शिक्षण विभागाकडील शालेय पोषण आहार, महिला व बाल कल्याणकडील स्तनदा व गरोदर माता, बालकांना पौष्टीक आहार वाटप आदींचा आढावा घेतला. यावेळी जिल्‍हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, सहायक आयुक्त श्रीमती अनिता राठोड आदी उपस्थित होते.

अनुसूचित जाती कल्याण समितीने केली कामांची पाहणी
समितीने बुलडाणा शहरातील नगर पालिकेने दलित वस्ती सुधार योजनेतंर्गत केलेल्या कामांची पाहणी केली. विश्रामगृहासमोर करण्यात आलेल्या कामांची चौकशीही समितीने केली. त्यानंतर मिलिंदनगर भागातील दलीत वस्तीमधील कामे, समस्या आदींची पाहणीही समितीने केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना कामाबाबत अत्यावश्यक त्या सूचनाही समितीने दिल्या. यावेळी समिती प्रमुख विधानसभा सदस्य तथा समितीप्रमुख प्रणितीताई शिंदे, विधानसभा सदस्य तथा समिती सदस्य सर्वश्री यशवंत माने, लखन मलिक, सुनील कांबळे, नामदेव ससाणे, अरूण लाड, राजेश राठोड, विधानमंडळ सचिवालयातील अवर सचिव प्र. श्री. खोंदले, कक्ष अधिकारी विनोद राठोड, सहा. कक्ष अधिकारी दत्तात्रय बेंगलवार आदी उपस्थित होते. त्यानंतर समितीने सर्क्युलर रस्त्यावरील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाची पाहणी केली. येथे वसतिगृह अधीक्षकांकडून माहिती घेतली. वसतिगृहातील सुविधा, गरम पाण्याची यंत्रणा, स्वच्छतागृह, निवासी खोल्या आदींची पाहणी करीत संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचनाही दिल्या. वसतिगृहामागील निर्माणाधीन इमारतीची पाहणीही समितीने केली. त्यानंतर समितीने कोलवड येथील अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलांच्या निवासी शाळेला भेट दिली. याठिकाणी असणाऱ्या सुविधांची माहिती घेत आपली निरीक्षणे नोंदविली. वर्गखोल्यांच्या स्वच्छतेविषयी सूचनाही दिल्या. त्यानंतर समितीने जांभरून येथे रमाई घरकुल योजनेतंर्गत लाभार्थी भास्कर अमृता गवई यांच्या घरकुलाची पाहणी केली. यावेळी समिती प्रमुख व सदस्यांनी लाभार्थ्याशी संवादही साधला. योजनेच्या लाभाविषयी चर्चा केली. याप्रसंगी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.