आज कोरोनाचा एकमेव रुग्‍ण खामगाव तालुक्‍यात आढळला!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः जिल्ह्यात आज, 4 ऑक्टोबरला कोरोनाचा एकमेव रुग्ण खामगाव तालुक्यातील जळका भडंग येथे समोर आला आहे. दिवसभरात एका रुग्णाला बरा झाल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 143 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 142 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 1 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त …
 
आज कोरोनाचा एकमेव रुग्‍ण खामगाव तालुक्‍यात आढळला!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः जिल्ह्यात आज, 4 ऑक्‍टोबरला कोरोनाचा एकमेव रुग्‍ण खामगाव तालुक्‍यातील जळका भडंग येथे समोर आला आहे. दिवसभरात एका रुग्‍णाला बरा झाल्याने रुग्‍णालयातून सुटी देण्यात आली आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 143 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 142 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 1 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 71 तर रॅपिड टेस्टमधील 71 अहवालांचा समावेश आहे. आजपर्यंत 720049 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86889 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 465 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत.

आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 720049 आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87581 कोरोनाबाधित रुग्ण असून, पैकी 86889 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यःस्थितीत कोविडचे 19 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 673 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.