अल्पवयीन मुलीचे अपहरण; मायलेकाविरुद्ध गुन्हा दाखल; मेहकर तालुक्यातील घटना
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. ही घटना १२ ऑगस्ट रोजी आंधुड (ता. मेहकर) येथे घडली. काल, २० ऑगस्ट रोजी मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी डोणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून शारा (ता. लोणार) येथील मायलेकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गीता लक्ष्मण फडके व सागर लक्ष्मण फडके (दोघेही रा. शारा ता. लोणार) अशी संशयितांची नावे आहेत. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार १२ ऑगस्ट रोजी ते व त्यांची पत्नी शेतातून घरी आले. तेव्हा त्यांची १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी दिसली नाही. तेव्हा त्यांनी विचारपूस केली असता ती दुपारी ४ वाजता मावशीकडे जाते, असे सांगून पर्स घेऊन गेली असे त्यांना कळाले.
तिच्या मावशीकडे चौकशी केली असता तिथेही ती नव्हती. तिच्या वडिलांना शारा येथील गीता लक्ष्मण फडके व तिच्या मुलावर संशय होता म्हणून त्यांनी त्यांच्या शारा येथील नातेवाइकाला फडके यांच्या घरी विचारपूस करायला सांगितली. तेव्हा तुमची मुलगी माझ्या मुलासोबत कुठेतरी पळून गेल्याचे गीता फडके हिने सांगितले. मुलीच्या वडिलांनी कालपर्यंत दोघांचा शोध घेऊन ते मिळून न आल्याने त्यांनी अपहरणाची तक्रार दिली.