अनोळखी नंबरवरून महिला डॉक्‍टरला I Love you मेसेज; खामगावातील प्रकार; अश्लील व्हिडिओही पाठवले!!

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव येथील राजपूत हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरला अनोळखी नंबरवरून अश्लील मेसेज, व्हिडिओचा भडिमार सुरू झाला. वेगवेगळ्या नंबरवरून हे मेसेज येत असल्याची तक्रार डॉक्टरांनी दिली असून, त्यावरून वेगवेगळ्या १२ मोबाइल नंबरधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काल, २६ ऑगस्ट रोजी रात्री तक्रार दिल्यानंतर आजही तसे मेसेज सुरूच असून, यामुळे डॉक्टर …
 
अनोळखी नंबरवरून महिला डॉक्‍टरला I Love you मेसेज; खामगावातील प्रकार; अश्लील व्हिडिओही पाठवले!!

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव येथील राजपूत हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरला अनोळखी नंबरवरून अश्लील मेसेज, व्हिडिओचा भडिमार सुरू झाला. वेगवेगळ्या नंबरवरून हे मेसेज येत असल्याची तक्रार डॉक्टरांनी दिली असून, त्‍यावरून वेगवेगळ्या १२ मोबाइल नंबरधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काल, २६ ऑगस्ट रोजी रात्री तक्रार दिल्यानंतर आजही तसे मेसेज सुरूच असून, यामुळे डॉक्टर परेशान झाल्या आहेत.

खामगाव येथील राजपूत हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. सौ. जयमाला परदेशी यांनी काल, २६ ऑगस्ट रोजी खामगाव शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार दिली आहे. २२ ऑगस्टपासून त्यांच्या मोबाइल नंबरवर + 1 (918)601-2801 या मोबाइल नंबरवरून अश्लील व्हिडिओ व मेसेज आला.त्यामुळे त्यांनी नंबरला ब्लॉक केले. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या नंबरवरून तसेच व्हिडिओ व पोस्ट आल्या. डॉक्टरांनी तोही नंबर ब्लॉक केला. त्यानंतर पुन्हा तिसऱ्या नंबरवरून अशा वेगवेगळ्या १२ मोबाइल नंबरवरून हे मेसेज येत होते. I love you असा मेसेजसुद्धा आला, असे डॉक्टरांनी तक्रारीत म्हटले आहे. डॉक्टरांनी सर्व मोबाइल नंबर ब्लॉक करून शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हाही दाखल केला. मात्र आज पुन्हा वेगवेगळ्या नंबरवरून मेसेज, व्हिडिओ, व्हिडिओ कॉल येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.