अनेक दिवसांपासून सुरू होता पाठलाग, पण ती भीतीपोटी कुणाला सांगत नव्हती, यामुळे त्‍याची हिंमत वाढून नर्ससोबत केले गैरकृत्‍य!, मेहकर तालुक्‍यातील घटना

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सुलतानपूर (ता. लोणार) येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स असलेल्या २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना २१ ऑगस्ट रात्री ८ च्या सुमारास घडली. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून मेहकर पोलीस ठाण्यात शेख सोहिल शेख ईसाख (२५, रा. मेहकर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीची रात्रपाळीची ड्युटी असल्याने ती …
 
अनेक दिवसांपासून सुरू होता पाठलाग, पण ती भीतीपोटी कुणाला सांगत नव्हती, यामुळे त्‍याची हिंमत वाढून नर्ससोबत केले गैरकृत्‍य!, मेहकर तालुक्‍यातील घटना

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सुलतानपूर (ता. लोणार) येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स असलेल्या २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना २१ ऑगस्ट रात्री ८ च्या सुमारास घडली. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून मेहकर पोलीस ठाण्यात शेख सोहिल शेख ईसाख (२५, रा. मेहकर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणीची रात्रपाळीची ड्युटी असल्याने ती हॉस्पिटलला जात होती. त्‍याचवेळी तुला दुचाकीवर सोडून देतो, असे म्हणत शेख सोहिल याने अश्लील वर्तन केले. तरुणीने त्‍याची तक्रार मेहकर पोलीस ठाण्यात केली. शेख सोहिल हा गेल्या अनेक महिन्यापासून माझा पाठलाग करत होता. मात्र भीतीपोटी ही बाब आपण कुणाला सांगितली नव्हती, असे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी शेख सोहिल याच्याविरुद्ध विनयभंग व ॲट्रॉसिटी कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला काल २२ ऑगस्ट रोजी अटक केली.