नळगंगा नदीच्या पात्रात बुडाल्याने युवकाचा मृत्यू; दाताळा येथील घटना!

 
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : नळगंगा नदीच्या पात्रात बुडाल्याने दाताळा येथील २७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज ५ ऑगस्ट राेजी सकाळी उघडकीस आली.गणेश रामभाऊ पठाडे (रा. दाताळा) असे मृतक युवकाचे नाव आहे. 
दाताळा येथील गणेश पठाडे हा मंगळवारी सकाळी शेतात जात  असल्याचे सांगून घरून निघून गेला हाेता. बराच वेळ  झाल्यानंतरही ताे घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबियांनी शाेध घेतला. परिसरात कुठेही ताे न आढळल्याने नळगंगा नदीच्या पात्रात ताे बुडाल्याची शंका ग्रामस्थांनी उपस्थित केली. त्यानुसार नदीच्या पात्रात शाेध घेतला असता त्याचा मृतदेह आढळला. पाेलिसांनी मृतदेह नदीपात्राच्या बाहेर काढून पंचनाम केला. तसेच उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. पुढील तपास मलकापूर ग्रामीण पाेलीस करीत आहेत.