युवा पत्रकार ऋषी भोपळे पाटील यांना "डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता" राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर..!
Sep 24, 2025, 21:19 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यातील चिखली तालुक्यामधील देऊळगाव घुबे या लहानशा ग्रामीण भागातून आलेला युवा पत्रकार कृषी भोपळे पाटील यांना यंदाचा "डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता" राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. एका लहानशा गावातून एक कमी वयाचा युवा पत्रकार तयार होतो आणि अल्पावधीतच विविध वृत्तपत्रांमध्ये आपल्या दर्जेदार वृत्त संकलनाने, विविध चॅनलच्या माध्यमातून दर्जेदार लिखाणाने बातम्यांच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रांमध्ये आपले नाव लौकिक करतो.
रोखठोक, बेधडक, सामाजिक राजकीय, विविध क्षेत्रातील दर्जेदार वृत्त संकलन करून लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारे पत्रकारिता क्षेत्रात उत्तुंग यशाची भरारी घेतली आहे. आपल्या पत्रकारिता क्षेत्रांमध्ये सर्वस्व झोपून काम करत असल्यामुळे त्यांचं हे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी असल्यामुळे या कार्याची दखल घेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तसेच स्वर्गीय मधुकरराव खंडारे यांच्या स्मृतिपितर्थ आयोजित एका बहारदार कार्यक्रमांमध्ये साखरखेर्डा तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा या ठिकाणी "उत्सव यशाचा, सन्मान कर्तुत्वाचा"म्हणून विविध मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार कृषी भोपळे पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, उत्कृष्ट ट्रॉफी, सन्मानपत्र, शाल,गुलाबपुष्प असे राहील. अत्यंत कमी वयामध्ये पत्रकारिता क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट नावलौकिक कामगिरी केल्यामुळे हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. या जाहीर झालेल्या पुरस्कारामुळे विविध क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.