अरेच्चा रवींद्र जडेजा ची बायको "हे"काय बोलून गेली! स्वतःचा नवरा चांगला पण भारतीय क्रिकेटपटूंना म्हणाली, विदेशात जाऊन ते चुकीचे काम..... क्रिकेट वर्तुळात खळबळ

 
मुंबई (लाईव्ह ग्रुप नेटवर्क) : "आपलं ते चांगलं पण दुसऱ्याच ते वांगल" अशी एक जुनी मन प्रचलित आहे.. आपला तो बाब्या अन् दुसऱ्याचं ते कार्ट अशीही एक त्याच अर्थाची म्हण आहे. आता तुम्ही म्हणाल हे इथं सांगायची काय गरज? तर हो...गरज आहेच..त्याला कारणच तसं आहे.. भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा ची बायको रिबाबा जडेजा हे नाव तुम्ही ऐकलं असेल. रिबाबा राजकारणात सक्रिय आहे. भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्यानंतर आता ती गुजरात सरकार मध्ये शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत आहे. अनेकदा क्रिकेटच्या मैदानावर रवींद्र जडेजाला सपोर्ट करताना तुम्ही तिला बघितलं असेल.. डोक्यावर पदर, कपाळावर कुंकू अशा शालीन रूपात बऱ्याचदा ती ग्राउंड वर दिसते, त्यामुळे तिच्या या"सांस्कृतिक" लुकचे बऱ्याचदा कौतुकही होते..मात्र आता हीच  टिकेचे टीकेचे लक्ष झाली आहे.
गुजरात मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात रिवाबाने गुजराती मध्ये भाषण केले. ते भाषण आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. त्या व्हिडिओ स्वतःच्या नवऱ्याचे कौतुक करताना मात्र इतर भारतीय क्रिकेटपटूंच्या वर्तनाबद्दल मात्र रिवाबाने धक्कादायक विधान केले आहे. भारतीय क्रिकेटपटू बऱ्याचदा विदेश दौऱ्यांवर असतात. विदेश दौऱ्यांवर खेळाडू कसे वर्तन करतात, काय काय करतात हे रिवाबाने सांगितले. मात्र हे सांगताना आपला नवरा मात्र तसा नाही हे सांगायलाही ती विसरली नाही..


नेमकं काय म्हणाली ?

रिवाबा म्हणाली की, "माझे पती क्रिकेट खेळण्यासाठी वारंवार ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, साऊथ आफ्रिका अशा देशांमध्ये जातात. मात्र तिकडे जाऊन त्यांनी कधीही नशा केली नाही. इतर खेळाडू मात्र व्यसनाधीन आहेत. तिकडे जाऊन ते नशा करतात.. मी त्यांना कोणतेही बंधन घातले नाही,मात्र स्वतःची जबाबदारी समजून ते ( रवींद्र जडेजा) कधीही व्यसन करीत नाहीत.."