साहेब 'आम्हाला १५०० नको, आमच्या घामाचे दाम द्या! चिमुकलीने आमदार राेहीत पवारांसमाेर मांडली शेतकऱ्यांची कैफीयत..!

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तेलाचा भाव ११५ रुपये लिटर आहे, पण सोयाबीनला फक्त ३-४ हजार रुपये क्विंटलच दर मिळतो. माझ्या बापाच्या घरात कधी तेल असते, पण मीठ नसते. वही घ्यायलाही खिशात १० रुपये नसतात. 'आम्हाला १५०० रुपये देऊ नका, पण आमच्या मालाला भाव द्या!' अशी आर्त मागणी आठवीत शिकणाऱ्या सीमा थुट्टे या विद्यार्थिनीने आमदार राेहीत पवार यांच्या माध्यमातून सरकारकडे केली. सीमा या निरागस बालिकेने उपस्थित केलेल्या प्रश्नाने तिथे उपस्थित असलेल्यांचे डाेळे पाणावले. तिने उपस्थित केलेल्या प्रश्नांनी उपस्थितांचे डोळे पाणावले. शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांच्या वेदना, संघर्ष आणि अपेक्षा यांचा निचोड सीमाच्या शब्दांतून बाहेर पडला.

वाढदिवस जाहिरात

जाहिरात...!👆

शेतीत राबराब राबूनही पदरी येणारी निराशा, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीमालाला न मिळणारा योग्य भाव यामुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले जात आहेत. अनेकांना तर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यावाचून पर्याय उरत नाही.

रोहित पवार यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांचे सांत्वन केले. पण सीमाच्या या प्रश्नांनी एक कळीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. शेतकऱ्याचा जीव गेल्यावरच सरकारला जाग येते का? केवळ आश्वासने आणि तात्पुरत्या मदतीने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यांना हवी आहे ती त्यांच्या घामाची किंमत, त्यांच्या पोटापाण्यावर चालणाऱ्या शेतीमालाला योग्य बाजारभाव. सीमाचा हा प्रश्न प्रत्येक संवेदनशील मनाला विचार करायला लावतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला याेग्य भाव देण्याची गरज आहे. तसे धाेरण शासनाने आखण्याची गरज आहे.