कारागृहात रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम; बंद्यांना बांधली राखी...
रक्षाबंधन हा बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा सण असल्याने कारागृहातील बंद्यांमध्ये कौटुंबिक भावना निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्या जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या सदस्यांनी बंद्यांसह कारागृह कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. याप्रसंगी बंद्यांना व्यसनमुक्तीची शपथही देण्यात आली.
कार्यक्रमाला कारागृह अधीक्षक मेधा बाहेकर, तुरुंगाधिकारी उमेश नाईक, तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या ब्रह्मकुमारी उर्मिला दीदी, ब्रह्मकुमारी पुनम दीदी, डॉ. लता बाहेकर, सुशांतभाई व संतोषभाई उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुभेदार दरेसिंग चव्हाण, हवालदार संजय मदरकर, कारागृह शिपाई राहुल पवार, आनंद पवार, दीपक वाघ यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सकारात्मक विचार, व्यसनमुक्ती आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे बंद्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.