पावसाअभावी सुकत चाललेल्या पिकांची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी; नुकसानीचे पंचनामे करण्याचे दिले निर्देश...

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पावसाने दडी मारल्यामुळे सुखत असलेल्या पिकांची पाहणी आज केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली . पाऊस नाही ही निसर्गाची अकृपा आहे खचून जाऊ नका सरकार तुमच्या पाठीशी आहे असा धीर त्यांनी शेतकऱ्यांना दिला. नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेत. 

यावर्षी जुन महिण्याच्या शेवटच्या आठवड्यात  पावसाळ्याला उशिरा सुरुवात झाली . शेतातील  पेरणी नंतर  पिके जोमाने वाढली परंतु  गेल्या दहा पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील पिके पावसाअभावी सुकत चालली आहे   बुलढाणा जिल्ह्यामध्ये 3 लाख 47 हजार हेक्टर सोयाबीनचे लागवड झाली  आहे सोयाबीनचे फुल आणि पापड्या लागण्याच्या तयारीतच असताना पावसाने पावसाने दडी मारली त्यामुळे 40% सोयाबीन पिकांचे नुकसान होत आहे तर 50 टक्के उत्पादनात घट अपेक्षित आहे अशा परिस्थितीत  शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौरा असताना त्यांनी आज खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा  अटाळी शहापुर  आडगाव बोरी शिर्ला नेमाने येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली निसर्गाच्या व कृपेला आपण काही करू शकत नाही परंतु खंबीर राहा सरकार तुमच्या पाठीशी आहे अशी ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली पाण्याअभावी सुकत चाललेल्या पिकांचे पंचनामे  करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्यात पाहणी करताना जिल्हा कृषी अधिकारी  संतोष डाबरे  उपविभागीय कृषी अधिकारी  बाळासाहेब व्यवहारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष डिवरे अमोल अंधारे तालुकाप्रमुख राजू बघे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी सदस्य व शेतकरी  उपस्थित होते.