केंद्रिय राज्यमंत्री प्रतापराव जाधव शेतकऱ्यांच्या बांधावर; जळगांव जामोद, संग्रामपुर तालुक्यातील अतिवृष्टी बाधीत गावांची केली पाहणी; नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे दिले प्रशासनाला निर्देश...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) गेल्या दोन दिवसापुर्वी अतिवृष्टी पावसाने बाधीत झालेल्या बुलढाणा जिल्हयातील जळगांव जामोद आणि संग्रामपुर तालुक्यातील बाधीत क्षेत्राची पाहणी आज केंद्रिय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली आहे. नुकसानीचे पंचनामे त्वरीत करुन शासनाला सादर करण्याचे निर्देशही प्रशासनाला दिले आहेत. 

30 आणि 31 जुलै ला बुलढाणा जिल्हयात अतिवृष्टी सदृष्य पाऊस झाला या पावसामुळे जिल्हयातील अनेक नागरीकांचे जनजिवन विस्कळीत झाले होते. तर संग्रामपुर आणि जळगांव जामोद तालुक्यातील गावांना मुसळधार पावसाचा सर्वाधीक फटका बसला होता. 31 जुलै च्या सकाळी जिल्हाधिकारी डॉ.प्रविण देवरे यांच्याशी दुरध्वनीवरुन  संपर्क साधुन झालेल्या अतिवृष्टीची माहिती घेतली. प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सुचना त्यांना यावेळी केल्या होत्या. तर आज 1 ऑगस्ट रोजी जिल्हयात आल्यानंतर तात्काळ जळगांव जामोद आणि संग्रामपुर तालुकयातील चावरा, इलोरा, मडाखेड खु. मडाखेड बु., काजेगांव, बोराळा बु., बोराळा खु., खेर्डा खु., खेर्डा बु., चांगेफळ रुधाणा वकाणा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पाहणी केली. यावेळी तहसिलदार पवन पाटील, अजाबराव वाघ, कृषी अधिकारी रमेश वाघ, गटशिक्षणाधिकारी एश्वर्या कोरे उपस्थित होत्या. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे तसेच घरांच्या पडझडीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला यावेळी दिले. तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आलेल्या संकटाला सामोरे जा सरकार तुमच्या पाठीशी आहे अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिली. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख शांताराम दाणे, जिल्हाप्रमुख संतोष डिवरे, उपजिल्हाप्रमुख देविदास घोपे, भाजपा नेते गजानन सरोदे, बंडु पाटील, युवासेना लोकसभा अध्यक्ष चेतन घिवे, तालुका प्रमुख केशव ढोकणे, कैलास कडाळे   राष्ट्रवादीचे चेतन देशमुख, रंगराव देशमुख, मोहन ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी सदस्य  उपस्थित होते.