पाेस्ट कार्यालयात कॅशच नाही; लाडक्या बहीणींच्या लागल्या रांगा; आमदार श्वेता महालेंच्या पुढाकाराने रांगेत असलेल्या महिलांना मिळाले पैसे..!

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ऑगस्ट महिन्यातील बॅंकांना सुट्या राहणार आहेत. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण व पिएम किसानचे पैसे जमा झाल्याने बॅंकांमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी वाढली आहे. त्यातच चिखली शहरातील मुख्य पाेस्ट कार्यालयात लाडकी बहीण याेजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांच्या रांगा लागल्या हाेत्या. मात्र, कॅश नसल्याने या महिलांना परत जावे लागणार हाेते. याविषयी माहिती मिळताच आमदार श्वेता महाले यांनी पाेस्टाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून कॅश उपलब्ध करून दिली. त्यामुळे, लाडक्या बहणींना त्यांचे हक्काचे पैसे मिळाले. 
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण याेजनेच्या लाभाचे पैसे खात्यात जमा झाले आहेत. हे पैसे काढण्यासाठी बॅंक आणि पाेस्टात माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत आहे. ऑगस्ट महिन्यात माेठ्या प्रमाणात सुट्या आल्याने महिलांचा खात्यातून पैसे काढण्याकडे कल वाढला आहे. चिखली शहरातील पाेस्ट कार्यालयात देखील महिलांनी पैसे काढण्यासाठी रांगा लावल्या हाेत्या. मात्र, कॅश नसल्याने या महिलांना परत जावे लागणार हाेते. याविषयी साखरखेर्डा भाजपचे अध्यक्ष शिवाजी वाघ यांनी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांना ही माहिती दिली. आमदार महाले यांनी  तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थिती सुधारण्याचे निर्देश दिले.त्यामुळे, महिलांना राेख रक्कम खात्यातून काढता आली. 

लाडक्या बहीणींनी मानले आमदार बहीणींचे आभार 
दिवसभर रांगेत राहूनही राेख नसल्याने परत जाण्याची वेळ लाडक्या बहीणींवर आली हाेती. याविषयी माहिती मिळताच आमदार श्वेता महाले यांनी काही वेळतच त्यावर उपाय याेजना केल्या. त्यामुळे, लाडक्या बहीणींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. या बहीणींनी आमदार बहीणीचे आभार मानले.