समृद्धीवर अपघाताची मालिका सुरुच; खासगी प्रवाशी बसची मालवाहुला धडक; ११ जण जखमी !
Jul 10, 2025, 15:23 IST
डाेणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून ९ जुलै राेजी सकाळी खासगी प्रवाशी बसने मालवाहु वाहनाला धडक दिली. खासगी प्रवाशी बस उलटली या मध्ये बस मधील ११ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मेहकर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.
डोणगाव जवळ असलेल्या चॅनल न. २६९ जवळ नागपुर कडून पुणे कडे जाणार्या खासगी बस क्र. एमएच १९ जीएस ५५५१ व नागपुर कडून पुणे कडे मासे घेऊन जाणार्या मालवाह चा अपघात होऊन ११जण जखमी झाल्याची घटना घडली. पिक अप गाडीवर लक्झरी आदळून लक्झरी रस्त्याच्या खाली जाऊन उलटली़ झाली यामध्ये ११प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून त्यामध्ये किरण प्रशांत हिवाळे नागपूर, महेश मुरलीधर जाधव रा.वाडनूस आमगाव, खुशाल मिलींद मेश्राम नागपूर, गणपत क्रोधी पुणे, स्वप्नील दादाराव नांदुरकर धामणगाव रेल्वे अमरावती, दृश्यंत मनोहरे नागपूर, किसन गोपाल इंगोले रतनगाव अमरावती, भुषण चाफले कारंजा घाडगे वर्धा, शिवम देशमुख नांदपुर कळमणूरी, भागवत देशमुख नांदपुर कळमनुरी, साक्षी प्रशांत हिबुरे नागपुर ह आदी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच डोणगाव पोलीस स्टेशन चे पोहेकॉ अरुण सरदार व पोकॉ कुंडलिक वाळले हे ताबडतोब घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत समृद्धी महामार्ग पोलीस आले व सदर जखमीना मेहकर येथे सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.या खासगी बसमध्ये ३० प्रवाशी हाेते. सुदैवाने त्यांचे प्राण वाचले.