धोतर-टोपी घालणाऱ्या शेवटच्या पिढीचा गौरवपूर्ण सत्कार; रामसिंग राजपूत यांच्या पुढाकारातून वरणा गावात अनोखा उपक्रम..!
Aug 16, 2025, 15:51 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह बुलडाणा) : स्वातंत्र्यदिनानिमित्त खामगाव तालुक्यातील वरणा गावात अनाेखा आणि उपक्रम राबवण्यात आला. राष्ट्रीय राजपूत करणी सेना राज्य उपाध्यक्ष रामसिंग राजपूत यांच्या पुढाकारातून गावातील धोतर-टोपी घालणाऱ्या शेवटच्या पिढीतील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. पारंपरिक पोशाखाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या उपक्रमाचे आयाेजन परिसरात चर्चेचा विषय ठरला.
एकेकाळी महाराष्ट्राची शान मानली जाणारी धोतर-टोपीची संस्कृती काळाच्या ओघात लुप्त होऊ लागली आहे. सध्या केवळ काही ज्येष्ठ नागरिकच हा पारंपरिक पोशाख परिधान करतात. या संस्कृतीचे जतन व्हावे आणि तरुण पिढीला याबाबत प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.कार्यक्रमाला गावाच्या सरपंच स्वाती उमेश इंगळे, ग्रामसेवक, उपसरपंच, सदस्य, शिक्षक कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे पारंपरिक मूल्यांच्या जतनाचा संदेश तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.