लालपरीतून देवदर्शन व पर्यटनाचा आनंद; एसटी महामंडळाची विशेष ‘पॅकेज टुर्स’ सेवा!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बुलढाणा विभागातर्फे प्रवाशांसाठी एक आनंददायी उपक्रम राबवण्यात येत आहे. विभागातील सर्व आगारांमधून एक ते तीन दिवसांच्या विशेष पॅकेज टुर्स सुरू करण्यात आल्या असून, या टुर्सद्वारे प्रवाशांना देवदर्शन आणि पर्यटनस्थळांना भेटी देता येणार आहेत.विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सेवा ग्रुप बुकिंगच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार बससेवा उपलब्ध करून देण्यात येईल.
एक दिवसासाठी असे आहे पॅकेज अजिंठा लेणी – घृष्णेश्वर – वेरूळ – खुलताबाद शेगाव, चिखलदरा, पैठण दोन ते तीन दिवसांची टुर्स: कपीलधार – तुळजापूर, अक्कलकोट – पंढरपूर, आळंदी – देहू – भिमाशंकर, शिर्डी – शनिशिंगणापूर – देवगड, औंढा नागनाथ – परळी वैजनाथ, नाशिक – सप्तशृंगी – वणी, त्र्यंबकेश्वर – मुक्ताईनगर – चांगदेव – इच्छापूर – अंमळनेर

 विशेष टुर्स: मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर व उज्जैन या तीर्थस्थळांसाठी खास सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवासाचे शुल्क, वेळापत्रक, बुकिंग प्रक्रिया याबाबत अधिक माहितीसाठी प्रवाशांनी नजीकच्या एसटी आगारात संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.