बेलगाव येथे शिक्षकांची पदे रिक्त; १४ ऑगस्टपासून पालक शाळेतच करणार उपाेषण; ५ ऑगस्टपासून पालकांचे आंदाेलन; शाळेकडून मिळालेल्या गणवेश आणि पुस्तके केली परत..!

 
डाेणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :येथून जवळच असेल्या बेलगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची पदे रिक्त आहेत.शाळेत शिक्षकांची नियुक्ती करावी, यासाठी पालकांनी ५ ऑगस्टपासून शाळेकडून मिळालेले पुस्तके आणि गणवेश परत करून आंदाेलन सुरू केले आहे. या आंदाेलनाची शिक्षण विभागाने अद्यापही दखल न घेतल्याने अखेर पालकांनी १४ ऑगस्टपासून शाळेच उपाेषण करण्याचा इशारा दिला आहे. 
पालकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषद शाळा बेलगांव येथे मागील सत्रात एक शिक्षक सेवानिवृत झाला आहे. एका शिक्षकाची पदाेन्नतीने तर एकाची पदावनतीने बदली झाली. या शाळेतील शिक्षक कमी झालेले आहेत.त्यांच्या जागेवर इतर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे, या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी  पालकांनी ५ ऑगस्ट २०२५ रोजी उलट क्रमवारीने एक एक वर्गाचे विद्यार्थी व पालक वरील प्रशासन यंत्रनेच्या निषेध व विद्यार्थी व पालकाचा शिक्षणावर बहिष्कार टाकण्या करीता मुख्याधापक यांच्याकडे शाळेकडुन मिळालेली पुस्तके व गणवेश परत करीत आहेत.आता सात दिवसांच्या आत शिक्षकांची नियुक्ती न केल्यास १४ ऑगस्ट राेजी पालक शाळेतच उपाेषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर दिनकर नागो मैद व विठ्ठल शेषराव वानखेडे, संतोष आश्रु पळसकर आदींसह इतरांची स्वाक्षरी आहे.