सुनील सुरडकर यांची बुलडाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीवर निवड! जिल्हा सचिव म्हणून पक्षाने सोपवली जबाबदारी....

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यातील तरुण आणि उत्साही कार्यकर्ते सुनील सुरडकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी औपचारिक नियुक्तीपत्र प्रदान करून ही घोषणा केली.
सुनील सुरडकर हे मूळचे चिखली तालुक्यातील बेराळा येथील असून सध्या त्यांचे वास्तव्य चिखली येथे आहे. सामाजिक कार्याची भक्कम पार्श्वभूमी असलेल्या सुरडकर यांनी ग्रामीण भागातील अनेक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. युवकांमध्ये जागृती घडवणे, शैक्षणिक उपक्रमांना हातभार लावणे तसेच सामाजिक भान असलेल्या विविध उपक्रमांतून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.

नियुक्तीनंतर जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांनी सांगितले की, "सुनील सुरडकर हे पक्षनिष्ठ, कार्यतत्पर आणि जनसंपर्कात सतत सक्रिय राहणारे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या नेतृत्वातून जिल्हा कार्यकारिणीला निश्चितच नवे बळ मिळणार आहे. संघटन विस्तार, कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविणे आणि ग्रामीण भागातील समस्यांवर पक्षाची भुमिका प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडतील, असा आम्हाला विश्वास आहे."सुनील सुरडकर यांच्या नियुक्तीमुळे चिखली शहर ,तालुक्यासह जिल्हाभरातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांचे मित्रपरिवार, कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले असून भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.