श्री संत गजानन महाराज संस्थान 'पुरग्रस्थांसाठी' सरसावले!१ कोटी ११ लाखांची मदत देवून सेवा कार्यासोबत जोपासली सामाजिक बांधिलकी...

 
शेगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज संस्थान,शेगाव कडून राज्यातील पूरग्रस्तांसाठी 'एक कोटी अकरा लाखांची' भरीव मदत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे धनादेशाद्वारे सुपुर्द करण्यात आली आहे.
राज्यभरात खास करून मराठवाड्यातील धाराशिव,बीड,जालना यासह महाराष्ट्रातील जवळपास एकोणतीस जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचे स्वप्ने पुरामध्ये वाहून गेले आहेत.अनेक मायबाप शेतकरी बेघर झाले आहेत.शेतकऱ्यांची गुरेढोरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत.अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे संसार पुराच्या पाण्यामुळे उध्वस्त झाले आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून व सेवाकार्य यासोबतच सामाजिक बांधिलकी जोपासत विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत गजानन महाराजांच्या शेगाव संस्थान कडून पूरग्रस्तांसाठी एक कोटी अकरा लाखांची भरीव मदत मुख्यमंत्री सहायता निधीस  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना २७ सप्टेंबर रोजी धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात आला आहे.