SHOCKING… बेपत्ता युवकाची मोटारसायकल अन् कपडे येळगाव धरणाच्या काठावर… शोध सुरू
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात काल, ८ सप्टेंबरच्या रात्री बेपत्ता झाल्याची नोंद असलेल्या तरुणाचे कपडे आणि मोटारसायकल आज, ९ सप्टेंबरला येळगाव धरणाच्या काठावर आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुरज सुभाष भोसले (२४, रा. राजपूत ले आऊट, बुलडाणा) हा तरुण काल बेपत्ता झाला होता. रात्री शहर पोलीस याप्रकरणी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल …
Sep 9, 2021, 17:45 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात काल, ८ सप्टेंबरच्या रात्री बेपत्ता झाल्याची नोंद असलेल्या तरुणाचे कपडे आणि मोटारसायकल आज, ९ सप्टेंबरला येळगाव धरणाच्या काठावर आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सुरज सुभाष भोसले (२४, रा. राजपूत ले आऊट, बुलडाणा) हा तरुण काल बेपत्ता झाला होता. रात्री शहर पोलीस याप्रकरणी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. सूरजचे वडील पोलीस दलात कार्यरत होते. तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्याने त्याचा मोबाइलसुद्धा घरी ठेवला होता. आज पहाटे त्याची मोटारसायकल (क्र. एमएच २८ के ४९७९) व कपडे धरणाच्या काठावर आढळल्याने शहर पोलिसांचे पथक, बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. सकाळपासून त्याचा धरणात शोध घेतला जात असून, वृत्त लिहिपर्यंत संध्याकाळी पावणेसहापर्यंत तो सापडला नव्हता.