गवंढाळ्यात शाळा, अंगणवाडीजवळ धोकादायक डी.पी. ! महावितरणचे जाणून-बुजून दुर्लक्ष; चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ..?
Updated: Sep 2, 2026, 16:59 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):खामगाव तालुक्यातील गवंढाळा गावात शाळा, अंगणवाडीच्या अगदी बाजूला असलेली विद्युत डी.पी. अत्यंत धोकादायक अवस्थेत असून, महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
डीपीची फेज पेटी पूर्णपणे जीर्ण झाली असून तिचे दरवाजे तुटलेले आहेत, आतील केबल्स उघड्यावर लटकत आहेत. डी.पी. च्या आजूबाजूला गवत वाढलेले असून शाळेतील व अंगणवाडीतील लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात गावकऱ्यांनी संबंधित एम.एस.सी.बी. चे शाखा अभियंता घोंगे यांना वारंवार तोंडी आणि लेखी तक्रार करूनही ते जाणून-बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अटाळी महावितरण कार्यालयाला पूर्वसूचना दिली असून.सात दिवसाच्या आत कार्यवाही न झाल्यास "शोले स्टाईल आंदोलन" छेडण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.