रविकांत तुपकर यांनी बोलावली शेतकऱ्यांची तातडीची बैठक; शेतकरी -तरुणांनी बैठकीला उपस्थित रहा-डॉ ज्ञानेश्वर टाले; बैठकीत शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा ठरणार!
या बैठकीत पुढील प्रमुख मागण्यांवर तीव्र संघर्ष छेडण्याची रणनीती ठरवली जाणार आहे, राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे. सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळाला पाहिजे. नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांचा हक्क असलेला १०० टक्के पीक विमा तातडीने मंजूर व्हावा. शेतीचे प्रचंड नुकसान करणाऱ्या जंगली जनावरांच्या त्रासातून शेतकऱ्यांची कायमची मुक्तता करा. त्यासाठी शेती ला मजबूत कंपाउंड द्या जळालेले शेतीचे ट्रान्सफॉर्मर विलंब न लावता तात्काळ बदलून द्या.शेतमजूर आणि कष्टकऱ्यांच्या कल्याणासाठी स्वतंत्र शेतमजूर महामंडळ स्थापन करा.यासह इतर शेतकरी प्रश्नांवर चर्चा करून पुढील शेतकरी आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे.
यासह येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकी च्या संदर्भात सुद्धा व न.प.निवडणुकीसंदर्भात चर्चा होार असल्याचे सांगितले जाते आहे
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अनेकवेळा रस्त्यावर उतरून सरकारला झुकवणारे रविकांत तुपकर या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे
या बैठकीचे आयोजन क्रांतीकारी शेतकरी संघटना, बुलढाणा यांनी केले असून, शेतकरी, शेतमजूर आणि तरुण वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर टाले यांच्या वतीने करण्यात आले आहे.