तर जिल्ह्यातील चार लाख ८८ हजार लाभार्थ्यांचे रेशन हाेणार बंद; वारंवार मुदतवाढ देउनही ई केवायसीकडे पाठ फिरवणे भाेवणार; ३१ जुलै राेजी संपणार मुदत..!
Jul 30, 2025, 17:45 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : रेशनकार्डावरील लाभार्थ्यांना ई केवयसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. वारंवार मुदतवाढ दिल्यानंतर जिल्ह्यातील चार ८८ हजार १३१ लाभार्थ्यांनी ई केवायसी केली नाही. या लाभार्थ्यांना ई केवायसी करण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत असून त्यानंतरही ई केवायसी न केल्यास या लाभार्थ्यांचे स्वस्त धान्य बंद हाेणार आहे.

रेशनकार्ड धारकांना मिळणारे लाभ सुरू ठेवण्यासाठी शासनाने लाभार्थ्यांची ई केवायसी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना वारंवार मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यात १३ तालुक्यांमध्ये अंत्याेदय आणि एपिएलचे १९ लाख १७ हजार २१९ लाभार्थी आहे. यापैकी १४ लाख २९ हजार ८० लाभार्थ्यांनीच ई केवायसी केली आहे. तसेच अद्यापही चार लाख ८८ हजार १३१ लाभार्थ्यांनी ई केवायसीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे, १ ऑगस्टपासून या लाभार्थ्यांचे रेशन बंद हाेण्याची शक्यता आहे. बाेगस लाभार्थ्यांना चाप लावण्यासाठी माेहिम राज्यभरात बाेगस लाभार्थ्यांना चाप लावण्यासाठी शासनाने ई केवायसी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत दाेन ते तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही लाभार्थ्यांनी ई केवायसी केली नाही. जिल्हाभरातील चार लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांचे रेशनचे लाभ बंद हाेण्याची शक्यता आहे.