जिल्ह्यात पावसाची धुवांधार बॅटींग; नदी, नाल्यांना पूर, अनेक रस्त्यांवरील वाहतुक ठप्प; हातणी येथील पुलावर पाणी असल्याने बुलढाणा ते चिखली मार्ग बंद; उत्रादा मार्गेही वाहतुक बंद..!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात दाेन ते तीन दिवसांपासून जाेरदार पाउस सुरू असल्याने नदी, नाल्यांना पूर आला आहे. हातणी येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने बुलढाणा आणि चिखली मार्गावरील वाहतुक बंद आहे. तसेच उत्रादा मार्गेही वाहतुक बंद असल्याने चिखलीचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्कच तुटला आहे.आणखी तीन तास पाणी ओसरण्याची शक्यता नसल्याने वाहतुक ठप्पच राहणार आहे. 
बुलढाणा शहरासह जिल्ह्यात गत काही दिवसांपासून जाेरदार पाउस हाेत आहे. त्यामुळे, नदी, नाल्यांना पूर आला असून पिकांचेही माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बुलढाणा ते चिखली मार्गावर असलेल्या हातणी गावातील पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे, या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. तसेच उत्रादा मार्गावरील पुलावरही पाणी असल्याने या मार्गावरही वाहतुक ठप्प असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील अनेक प्रकल्प ओव्हर फ्लाे झाले असून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे, नद्यांना पूर आले असून काही पुलांवरून पाणी वाहत आहे. 

चिखलीत आज आणि उद्या शाळा, महाविद्यांलयांना सुटी 
चिखली गत काही दिवसांपासून जाेरदार पाउस सुरू आहे. त्यामुळे, तहसीलदारांनी आज १८ ऑगस्ट आणि उद्या १९ ऑगस्ट राेजी शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. या पावसामुळे पिकांचेही माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.