राहुल बोद्रेंच्या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता! म्हणाले, "ज्या महिलेला दाखवायचं असतं की ती पतीव्रता आहे,तीच मोठ कुंकू लावते...मोठ मंगळसूत्र घालते...."
Apr 4, 2026, 15:44 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या विधानाने आता एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्हा काँग्रेस कार्यालयात आज ४ एप्रिलला एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल बोंद्रे यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले..ज्या महिलेला दाखवावं लागतं की ती पतीव्रता आहे, तीच मोठ कुंकू लावते, मोठ मंगळसूत्र घालते असे विधान त्यांनी केले आहे..
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित संघटन सृजन अभियानाच्या निमित्ताने जिल्हा काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या प्रकार परिषदेला अभियानाचे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह, जिल्हा निरीक्षक अब्दुल हनान, आ. धीरज लिंगाडे,माजी आमदार वीरेंद्र जगताप, प्रशांत पचार , ऐश्वर्या राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. पत्रकार परिषदेदरम्यान राहुल बोंद्रे त्यांच्याबद्दल सध्या सुरू असलेल्या शिवसेना पक्ष प्रवेशाच्या चर्चेच्या मुद्द्यावर बोलत होते."तुम्ही शिवसेनेत जाणार आहे अशी चर्चा आहे?" असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता राहुल बोंद्रे म्हणाले की,"भाजपवाल्यांची देशभरातील पॉलिसी आहे, त्यांच्याबद्दल चर्चा करत राहायची.. कार्यकर्त्यांवर दबाव निर्माण करायचा आणि त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घ्यायचा..त्यानुसार त्यांची ही सोची समझी चाल आहे, त्यानुसार ते चर्चा करत राहतात.. मी एकदाच सांगितलं आहे, परत परत सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही.. जी कोणी महिला असते.. तिला दाखवावं लागतं किती पतीव्रता आहे, ती मोठ कुंकू लावते, मोठ मंगळसूत्र घालते.. प्रत्येकाला तशी आवश्यकता नसते.." अस राहुल बोंद्रे म्हणाले. दरम्यान बोंद्रे यांच्या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे..मोठ कुंकू आणि मोठ मंगळसूत्र घालत परंपरा जपणाऱ्या महिलांबद्दल राहुल बोंद्रे यांचं हे विधान आक्षेप निर्माण करणार ठरू शकतं..