Career Point, बुलढाणा तर्फे ‘प्रतिभोत्सव 2025’ सोहळा संपन्न...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी Career Point, बुलढाणा सेंटरचे संचालक श्री. विजय पवार सर होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत सांगितले की, “यश हे फक्त गुणांमध्ये नसून, सततच्या प्रयत्नात आणि शिकण्याच्या उत्सुकतेत दडलेले असते.”
या सोहळ्यात इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या सर्व वर्गांतील गुणवंत विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक चाचण्यांमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना Career Point परिवाराकडून दिवाळी शुभेच्छा भेट आणि गोडवा म्हणून लाडूंचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकवर्ग आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या सोहळ्याचा आनंद घेत विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन संस्थेच्या शिक्षकवर्गाने तर आभारप्रदर्शन Career Point परिवाराच्या वतीने करण्यात आले.
 हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव तर होता, पण त्याचबरोबर सर्वांसाठी प्रेरणेचा आणि आनंदाचा एक अविस्मरणीय सोहळा ठरला.

 
                            